दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Kia Motors ची SUV Seltos ला भारतात चांगलं यश मिळालं आहे. कंपनीने 2019 मध्ये ही एसयूव्ही भारतात लॉन्च केली होती. भारतात या कारला मिळालेला प्रतिसाद पाहून कंपनी आता याचा फेसलिफ्ट व्हेरिएंट घेऊन येत आहे. कंपनी नवीन Kia Seltos फेसलिफ्ट लवकरच बाजारात लॉन्च करू शकते, असे बोलले जात आहे. असं असलं तरी नवीन Kia Seltos लाँच करण्याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, Kia Seltos फेसलिफ्ट व्हेरिएंटला अलीकडेच चाचणी दरम्यान पाहण्यात आलं आहे. Kia Motors ने Kia Seltos फेसलिफ्टचे काम जवळपास पूर्ण केले असून कंपनी 2022 च्या मध्यात ही कार लॉन्च करू शकते. कंपणीने आपल्या या नवीन कारमध्ये अनेक बदल केले आहेत. हेडलॅम्पपासून बोनेट आणि फ्रंट ग्रिलपर्यंत कारचे डिझाइन अपडेट केले आहेत. ज्यामुळे ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगली दिसत आहे. कंपनी या कारमध्ये नवीन डिझाइन केलेले एलईडी हेडलाइट्स आणि पुढील बाजूस नवीन डिझाइन केलेले क्रोम ग्रिल देऊ शकते.


कंपनी ही कार ड्युअल टोनमध्ये लॉन्च करू शकते. स्पॉट केलेल्या मॉडेलमध्ये सिंगल टोन अलॉय व्हील होते. तसेच याआधी जेव्हा Kia Seltos फेसलिफ्ट दिसली होती, तेव्हा त्यात डायमंड कट असलेले 17-इंच अलॉय व्हील दिसले होते. अशातच आता कंपनी या एसयूव्हीमध्ये अलॉय व्हीलचे दोन पर्याय देऊ शकते, असे बोलले जात आहे.


फीचर्स आणि इंजिन 


यात सहा एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल, ESC, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, रिअर पार्किंग सेन्सर, ISO फिक्स्ड चाइल्ड अँकर सीट आणि रिअर पार्किंग सेन्सर यासारखे फीचर्स कंपनी देऊ शकते. तसेच कंपनी या SUV मध्ये नवीन टर्बो डिझेल इंजिन देऊ शकते. जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनशी जोडलेले असू शकते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



Car loan Information:

Calculate Car Loan EMI