नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी याआधीच 8 चाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता 1 ऑक्टोबर, 2022 नंतर तयार होणाऱ्या वाहनांत 6 एअरबॅग्स अनिवार्य असणार, या अधिसूचनेच्या मसुद्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. जानेवारी 2022 मध्ये याबाबत अधिसूचना करण्यात आली होती. ज्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार 8 प्रवासी बसण्याची क्षमता असणाऱ्या 3.5 टनहून कमी वजनाच्या सर्व कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य असणार आहेत. याआधीच 1 जानेवारी 2022 पासून सर्व वाहनांमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत.


गाड्यांच्या किंमतीवर किती फरक पडणार?


या नव्या एअरबॅग्स गाडीत बसवल्यामुळे निश्चितच गाडीच्या किंमतीमध्ये फरक पडणार आहे. गाडीची किंमत जवळपास 50 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता ऑटो तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कारण वाहनांत एअरबॅग्स वाढविल्यास एअरबॅग्सचा खर्च शिवाय त्यासाठी गाडीच्या रचनेत, इंटीरीयरमध्ये बदल करावा लागणार असल्याने गाडीच्या निर्मितीचा खर्च वाढणार आहे.


'या' गाड्यांमध्ये आहेत 6 एअरबॅग्स


सद्यस्थितीला बऱ्याच गाड्यांच्या मीड-व्हेरियंट आणि टॉप व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स दिल्या जात आहेत. उदाहरणार्थ मारुती बलेनोचे टॉप दोन व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात येतात. याशिवाय Ertiga, XL6, Ciaz आणि भविष्यात येणाऱ्या SUV मॉडेल्समध्ये सहा एअरबॅग्स देण्यात येणार आहेत. याशिवाय ह्युनडाईच्या क्रेटा आणि वर्णा या मॉडेलच्या टॉप व्हेरियंटमध्ये देखील 6 एअरबॅग्स आहेत.  


फायदा


इस नियम के लागू होने के बाद सरकार का मानना है कि सड़क दुर्घना के दौरान होने वाली मौतों की संख्या में कमी देखने को मिल  सकती हैं। वहीं प्रत्येक लोगों के सेफ्टी के लिए गाड़ी में एयरबैग का होना जरूरी है।


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI