Kia Carens : अतिशय जुनी कार कंपनी असणाऱ्या किआ कार कंपनीने मागील काही वर्षात भारतात गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. सोनेट, सेल्टॉस अशा काहीच गाड्या कंपनीने आतापर्यंत बाजारात आणल्या असल्यातरी ग्राहकांनी मात्र या कार्सना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता कंपनी किआ कॅरेन्स (Kia Carens) ही नवी कार लवकरच बाजारात आणणार असून या गाडीची पहिली झलक कंपनीने प्रसिद्ध केली आहे. तसंच 16 डिसेंबर रोजी ही गाडी लाँच होणार असल्याची शक्यता आहे

 

किआ इंडियाने किआ कॅरेन्सचे काही स्केचेस नुकतेच सर्वांसमोर आणले. दरम्यान 16 डिसेंबर, 2021 ला कंपनीच्या जागतिक प्रीमियरसाठी कंपनी हे नवीन प्रोडक्ट नक्कीच लाँच करणार असेल. यावेळी गाडीत आरामदायी इंटेरियर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड डिझाईन आणि बसणाऱ्यांसाठी आरामदायी जागा अशा सुविधा असणार आहेत. यागाडीची विशेष गोष्ट म्हणजे अधिक व्यक्ती गाडीत बसू शकणार असल्याने किआ कॅरेन्सची रचना ज्यांना एकत्र प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे अशा मोठ्या कुटुंबासाठी खास करण्यात आली आहे.  

 

अशी आहे किआ केरेन्स 

 

किआ केरेन्स कंपनीचे अनोखे आणि शक्तिशाली डिझाइन अगदी आधुनिक आणि डँशिंग दिसते. गाडीच्या अनेक पार्ट्स हे हाय-टेक आणि स्टायलिश असे आहेत. पुढच्या बाजूस टायगर फेस डिझाइन, तसेच इनटेक ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स यामुळे गाडी पुढून पाहता क्षणी कोणाचंही लक्ष वेधून घेते. आतमध्ये अगदी आरामदायी आणि उत्तम असं इंटिरियर डिझाईन असल्याने आतमध्ये बसण्याचा अनुभव उत्तम आहे. दरम्यान गाडीचे तांत्रिक फिचर्स लवकरच कंपनी समोर आणणार असून सध्यातरी काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत.  

 

हे ही वाचा


Car loan Information:

Calculate Car Loan EMI