Kia Carens Global Ncap Rating: Kia Carens MPV ने सुरक्षिततेच्या बाबतीत आपल्या ग्राहकांना निराश केलं आहे. नुकतीच Kia Carens ची सेफ्टी टेस्ट झाली. ही सेफ्टी टेस्ट ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (GNCAP) द्वारे करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टी लक्षात घेऊन रेटिंग दिली जाते. क्रॅश टेस्टमध्ये वापरण्यात आलेल्या किआ कारच्या भारतीय मॉडेलमध्ये दोन फ्रंट एअरबॅग्ज, दोन साइड-बॉडी एअरबॅग्ज आणि दोन साइड हेड प्रोटेक्शन एअरबॅग्ज बसवण्यात आल्या होत्या. हे मॉडेल मानक म्हणून ESC सह येते.


ग्लोबल एनसीएपीचे सरचिटणीस अलेजांद्रो फ्युरेस म्हणाले, "केर्न्समध्ये सहा एअरबॅग्ज एक मानक सुरक्षा फीचर बनविण्याच्या किआच्या निर्णयाचे ग्लोबल एनसीएपी स्वागत करते. मात्र आम्हाला या मॉडेलकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ही चिंतेची बाब आहे की, किआ जागतिक कार ब्रँडप्रमाणेमी, ज्याला इतर बाजारपेठांमध्ये 5-स्टार रेटिंग मिळते. ती भारतात अजूनही सुरक्षेच्या बाबतीत त्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाहीत."


ग्लोबल NCAP ला क्रॅश टेस्टमध्ये आढळले की Kia Carens MPV ची रचना स्थिर नाही. एजन्सीला आढळले की किआ कार अजूनही थ्री-पॉइंट सीट बेल्टऐवजी मागील मध्यभागी बसण्याच्या स्थितीत लॅप बेल्टसह विकल्या जात आहेत. किआ केअर्सने अडल्ट सुरक्षेमध्ये 17 पैकी 9.30 गुण आणि चाईल्डच्या सुरक्षेत 49 पैकी 30.99 गुण मिळवले. या मॉडेलची 64 किमी प्रतितास वेगाने चाचणी घेण्यात आली. ग्लोबल NCAP द्वारे चाचणी केलेले शेवटचे Kia मॉडेल सेल्टोस होते, ज्याला अडल्ट सुरक्षेसाठी 3 स्टार आणि चाईल्ड सुरक्षिततेसाठी 2 स्टार मिळाले. Kia Seltos चे हे मॉडेल दोन एअरबॅग्ज आणि प्रीटेन्शनर ABS ब्रेकिंग यांसारख्या मानक फीचर्ससह सुसज्ज होते. 


ग्लोबल एनसीएपी म्हणजे काय?


ग्लोबल एनसीएपी ( Global New Car Assessment Program) ही एक संस्था आहे. जी स्वतंत्रपणे नवीन कारची अनेक पॅरामीटर्सवर क्रॅश टेस्ट करून रेटिंग प्रदान करते. ही संस्था टेस्ट केलेल्या कारला 0-5 तारे रेटिंग देते. कार कंपन्यांसाठी ग्लोबल NCAP रेटिंग खूप महत्वाचे आहे. कारण रेटिंग मिळाल्याने कारचे चांगले मार्केटिंग होते. तांत्रिकदृष्ट्या या क्रॅश टेस्टमध्ये सर्वात कमी रेटिंग किंवा स्टार मिळालेल्या कार अपघाताच्या वेळी सुरक्षित मानल्या जात नाहीत. टेस्ट केलेल्या कारला 0-5 तारे रेट केले जातात. एक ते तीन स्टार रेटिंग असलेल्या कार अपघाताच्या वेळी सर्वात कमी सुरक्षितता देतात, तर 4 ते 5 रेटिंग असलेल्या कार सर्वात सुरक्षित असतात. क्रॅश टेस्टिंग रेटिंग अडल्ट सुरक्षा, चाईल्ड सुरक्षितता यासह अनेक पॅरामीटर्सवर विभागली जातात. कारच्या आत, ड्रायव्हरच्या सीटवर आणि प्रवाशांच्या सीटवर मानवी आकाराच्या बाहुल्या ठेवल्या जातात आणि त्यांच्यावरील अपघाताचा परिणाम तपासला जातो.


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI