TVS Upcoming Bike : सर्वात जुन्या बाईक निर्माता कंपनी TVS ने आपल्या पोर्टफोलिओचा अधिक विस्तार करत आहे. यामध्ये तुमच्या बजेटमध्ये बसतील अशा मोटर सायकलपासून ते अगदी स्पोर्ट्स बाईकपर्यंत खूप काही पाहायला मिळणार आहे. परंतु, TVS कडे एकही क्रूझर बाईक नाही. अशी अपेक्षा असली तरी, आता कंपनी भारतात आपली पहिलीच क्रूझर बाईक लॉन्च करणार आहे. 6 जुलेै रोजी या बाईकची झलक पाहता येणार आहे. ही बाईक नेमकी कशी असेल, यामध्ये कोणते फीचर्स असतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


रिपोर्ट्सनुसार, ही आगामी बाईक Zeppelin क्रूझर असू शकते. असा अंदाज यासाठी वर्तवला जात आहे कारण Zeppelin R क्रूझर संकल्पनेला ऑटो एक्सपो 2018 मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याचवेळी कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला ' Zeppelin R' नावाचे पेटंटही घेतले होते.


अंदाजे फीचर्स : 


लो-स्लंग क्रूझर फॉर्म फॅक्टर Zeppelin R संकल्पनेमध्ये दिसला होता. त्यात सिंगल-पीस स्टेप केलेले सीटही दिसत होते. स्पोर्टी लूकसाठी स्पोर्टियर फ्लॅट हँडलबारही होता. याशिवाय, यात एकात्मिक एलईडी डीआरएल आणि हेक्सागोनल हेड लाइट असेंब्ली देखील आहे. येथे एक गोष्ट म्हणजे, लॉन्चच्या वेळी कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये जे दिसले होते तेच फीचर्स असतील याची शाश्वती देता येत नाही. मात्र, ही नवीन क्रूझर बाईक फार वेगळी असू शकते.  


कंपनीने आपल्या प्रसिद्ध बाईक Raider 125 ची किंमत वाढवली आहे. TVS ने फक्त डिस्क ब्रेक व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत. त्याच वेळी, ड्रम ब्रेक व्हेरिएंट जुन्या किमतीतच उपलब्ध असेल. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, TVS Raider 125 डिस्क ट्रिमची किंमत आता 90,989 रुपये (एक्स-शोरूम) वर गेली आहे. पूर्वी ही किंमत 89,089 रुपये होती.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI