Electric Vehicle In India: भारतीय बाजारपेठेत 2026-27 पर्यंत दुचाकींची मागणी 100% असेल, असा अंदाज NITI आयोग आणि TIFAC ने जाहीर केलेल्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. या अहवालाचा विषय 'भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या प्रवेशाचा अंदाज' असा आहे. ज्यात भारतीय बाजारपेठेत पुढील 5 वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अधिक दिसून येईल आणि 2027 पर्यंत ही मागणी 100% पर्यंत पोहोचू शकेल, असं सांगण्यात आले आहे.


भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आविष्कारांची प्रगती, मूल्यांकन आणि समर्थन करण्यासाठी TIFAC नावाची एक संस्था 1988 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ही एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था धोरण, तंत्रज्ञान विकास, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता यासारख्या क्षेत्रात काम करते. 


2032 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी 72% पर्यंत पोहोचेल


या अहवालानुसार, जर 2025-26 पर्यंत संशोधन आणि विकासाद्वारे इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंज आणि पॉवरमध्ये 5% वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत ही वाढ 10% ने दिसून येईल. तसेच आर्थिक वर्ष 2021 -32 पर्यंत, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी 72% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2028 ते 29 या काळात भारतात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री 220 लाख युनिट्सच्या पुढे पाहिली जाऊ शकते.


इलेक्ट्रिक वाहनांमध्ये होणार मोठे बदल 


अहवालात म्हटले आहे की, भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्येही बदल पाहिले जाऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहनांबाबत देशातील ग्राहकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात चार्जिंग पॉइंट स्टेशन्सची स्थापना करावी लागेल. जारी केलेल्या अहवालात असेही म्हटले आहे की, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींदरम्यान, ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसत आहे आणि ही इलेक्ट्रिक वाहने लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI