Independence Day 2022 Special: HM Ambassador आणि Maruti 800 सारख्या कारने भारताच्या ऑटोमोबाईल सेक्टरचा चेहरामोहरा बदलला आहे. भारताला स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष पूर्ण होत असताना अशाच काही आधुनिक कारबद्दल माहिती घेऊ ज्यांनी भारतात वाहन बाजार पूर्णपणे बदलून टाकले आहे.
Hyundai Creta: भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ज्या SUV ने सर्वात जास्त बदललेती म्हणजे Hyundai Creta. याच कारने कॉम्पॅक्ट SUV ची सुरुवात केली. जी आता प्रत्येक कार उप्तादक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ही कार भारतातील सर्वात यशस्वी कारपैकी एक आहे. आकर्षक लूक आणि अनेक इंजिन पर्यायसह नेक्स्ट जनरेशन Creta देखील भारतात यशस्वी ठरत आहे.
Maruti Baleno: मारुतीने भारतीयांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केलं आहे. ही कार कंपनी भारतात सर्वात यशस्वी सिद्ध झाली आहे. कंपनीने भारताला आता आवश्यक असलेल्या कारच्या प्रकारातही वाढ केली आहे.बलेनो मारुतीसाठी एक मोठी गेम-चेंजर कार ठरली आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या टॉप 3 कारमधील ही एक आहे. नवीनतम तंत्रज्ञान आणि फीचर्ससह ही एक प्रीमियम हॅचबॅक आहे. या कारने स्विफ्ट किंवा अल्टोलाही विक्रीच्या बाबतीत मागे टाकेल आहे.
Maruti Dzire: DZire ने कार क्षेत्रात एक वेगळेच सेगमेंट तयार केले आहे. जी सामान्य ग्राहकांची हॅचबॅक आणि सेडानचे गुण एकाच कारमध्ये उपलब्ध करून देते. डिझायर ही पुन्हा भारतात सर्वाधिक विकली जाणारी सेडान ठरली आहे.
Toyota Innova: इनोव्हा ही सर्वात विश्वासू कार असल्याचा दावा केला जातो. भारतीय बाजारपेठेतील ही सर्वात महत्त्वाची कार आहे. इनोव्हाचा स्वतःचा असा एक वेगळा ग्राहकवर्ग आहे. जो इतर कोणतीही कार खरेदी करण्यास नकार देतो विश्वासार्हतेसह ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात पसंतीची कार बनली आहे.
Honda City: भारतातील पहिली प्रीमियम सेडान असण्यासोबतच ही कार प्रत्येक पिढीतील ग्राहकांची आवडती कार आहे. या कारच्या पहिल्या काही पिढीचे मॉडेल्स भारताला उत्कृष्ट VTech इंजिनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. सध्याच्या सिटीसह नंतरची मॉडेल्स, सर्वाधिक विकली जाणारी सेडान तसेच हायब्रिड पॉवरट्रेन सारख्या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत अधिक प्रीमियम बनली आहेत.
Mahindra Scorpio: आणखी एक ब्रँड जो भारताचा खूप आवडता असून स्कॉर्पिओ आणि महिंद्रा याच्या सर्वाधिक लोकप्रिय कार आहेत. स्कॉर्पिओ ही भारतातील पहिली SUV आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये ही एसयूव्ही खूप अपडेट झाली आहे. स्कॉर्पिओचे आकर्षण आणि त्याला मिळणारे प्रेम यामुळे ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रसिद्ध कार बनली आहे. नवीन Scorpio N ब्रँडला प्रीमियम दिशेने घेऊन जात आहे.
Tata Nexon: Tata Nexon: Nexon ही जागतिक NCAP रेटिंगमध्ये 5 स्टार मिळवणारी पहिली भारतीय कार ठरली आहे. भारतीय बाजारपेठेतील ही इलेक्ट्रिक कार खऱ्या अर्थाने यशस्वी EV ठरली आहे. टाटा मोटर्सची ही सर्वात महत्त्वाची कार आहे. कारण या कारने कंपनीला पूर्णपणे नवीन स्तरावर नेले आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI