Hyundai N Line Review: कार निर्माता कंपनी Hyundai India ने आपली दमदार SUV Hyundai Venue N-Line अलीकडेच लॉन्च केली आहे. ही कार फक्त परफॉर्मन्सच्या बाबतीतच नाही तर स्टाईलच्या बाबतीतही जबरदस्त आहे. व्हेन्यू एन लाइन अशा लोकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांना सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही चालवताना वेगळा अनुभव घेण्याची इच्छा आहे.   


लूक 


या कारच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेन्यूपेक्षा ही कार खूप वेगळी दिसते. यामध्ये एन-लाइन बॅजिंग अनेक ठिकाणी दिसत आहे. तसेच यात गडद क्रोम ग्रिल, एक टेलगेट स्पॉयलर तसेच बम्परवर लाल हायलाइट्स मिळतात. छतावरील रेल, साइड सिल आणि फेंडर्स व्यतिरिक्त, यात एन लाइन ब्रँडिंगसह नवीन 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील मिळतात. याचा फ्रंट ब्रेक कॅलिपर देखील लाल रंगात देण्यात आला आहे. हे अपग्रेडेड स्पोर्टी टचसह डिझाइन केले गेले आहे. तसेच ही कार जास्त मेहनत न करता आरामात चालवता येते.


इंटिरिअर 


नवीन स्टीयरिंग व्हीलसह इंटिरिअरला स्लीक लूक देण्यात आला आहे. ज्याला ऑल-ब्लॅक लूकसह लाल हायलाइट्समध्ये उत्कृष्ट डिझाइन देण्यात आले आहे. यामध्ये नवीन गीअर शिफ्टरसह स्पोर्टी दिसणाऱ्या सीट्स देण्यात आल्या आहेत. सीट्सचा लूकही खूप स्पोर्टी आहे.


इंजिन 


व्हेन्यू एन लाइनमध्ये 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 120bhp आणि 172Nm पॉवर जनरेट करते. हे 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही सामान्य व्हेन्यूच्या तुलनेत खूप वगेळी आहे. याच्या ड्युअल एक्झॉस्टमध्ये एक लाऊड एक्झॉस्ट नोट आहे, जी खूप आवाज करत नाही. परंतु यामुळे तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल. यामध्ये दिलेला नवीन 7-स्पीड DCT स्मूद आणि स्लीकर आहे. तर स्पोर्टसह ड्राइव्ह मोड्समध्ये एन लाईनचे वेगळेपण चांगल्या प्रकारे हायलाइट होते.


ड्रायव्हिंगचा अनुभव


ही कार ड्रायव्हरला कडक सस्पेन्शन आणि हेवी स्टिअरिंगसह वेगळा अनुभव देते. याचे स्टीयरिंग हाय स्पीड आणि खडबडीत रस्त्यांवर उत्तम अनुभव देते. कडक सस्पेन्शनमुळे खडबडीत रस्त्यावरही ग्राउंड क्लीयरन्स खराब होत नाही. जी भारतीय रस्त्यांसाठी मोठी गोष्ट आहे. ही एक अतिशय वेगवान कार आहे, जी लोकांना जास्त आवडेल. याच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये स्टँडर्ड व्हेन्यूपेक्षा खूप जास्त सुधारणा करण्यात आली आहे. ड्रायव्हिंगच्या दृष्टीने स्टँडर्ड व्हेन्यूमध्ये काही कमतरता आहे असे नाही, पण व्हेन्यू एन लाईनमध्ये केलेल्या बदलांमुळे गाडी चालवण्याचा वेगळाच आनंद मिळतो.


एकंदरीत ही कार स्टँडर्ड व्हेन्यूपेक्षा खूपच वेगळी आहे. याची स्टाइलिंग, एक्झॉस्ट, परफॉर्मन्स, ड्रायव्हिंगचा अनुभव उत्कृष्ट आहे. पण यात एक कमतरता आहे की, ही फक्त ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायात उपलब्ध आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI