Triton Electric Vehicle: अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकल (Triton Electric Vehicle) भारतात आपले पहिले मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने लवकरच भारतात हायड्रोजनवर चालणारी दुचाकी आणि तीन चाकी वाहने लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या कंपनीने लॉन्चच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. या वर्षी मार्चमध्ये कंपनीने माहिती दिली होती की, त्यांनी भारतातील पहिला उत्पादन कारखाना सुरू करण्यासाठी गुजरातमधील भुजची निवड केली आहे.


शुक्रवारी याची घोषणा करताना कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ हिमांशू पटेल म्हणाले की, "लवकरच भारतीय रस्त्यांवर आमची पहिली दुचाकी असेल." आगामी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे उत्पादन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. हिमांशू म्हणाले की, "हायड्रोजन-इंधन असलेली वाहने ट्रायटन ईव्हीसाठी प्रगतीचे संकेत आहेत. कारण नवीन युगाशी ताळमेळ राखणे याला आमचे प्राधान्य आहे."


ट्रायटन ईव्हीने 600 एकरपेक्षा जास्त जमिनीवर भूजमध्ये आपला प्लांट स्थापन केला आहे. पूर्ण बांधकाम झाल्यानंतर या प्लांटचा आकार 3 दशलक्ष चौरस फूट इतका असेल. कंपनी अहमदाबादजवळील आनंद येथे हायड्रोजन आधारित वाहनांवर संशोधन आणि डेव्हलपमेंट करत आहे. हा प्लांट कंपनीची जागतिक स्तरावर संशोधन आणि विकास क्षमता दुप्पट करेल. कंपनी जागतिक बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक कार, ट्रक वाहने तयार करत आहे.


कंपनीने इलेक्ट्रिक वाहन देखील तयार करेल


कंपनीची आठ आसनी इलेक्ट्रिक SUV गेल्या वर्षी हैदराबादमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. यापूर्वी कंपनीची तेलंगणामध्ये प्लांट उभारण्याची योजना होती. कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रिक कार, SUV आणि पिकअप ट्रक तयार करण्यासाठी भारतात उत्पादन सुविधा उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून कंपनीची उत्पादने भारतात तसेच इतर आशियाई देशांमध्ये विकता येतील.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI