Tork Starts Delivery: टॉर्क मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नवीन इलेक्ट्रिक बाईक Kratos आणि Kratos R सादर केल्या होत्या. यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 1.08 लाख आणि 1.23 लाख रुपये आहे. याच्या सप्लाय चेनमध्ये अडचण आल्याने या बाईकची प्रस्तावित डिलिव्हरी एप्रिलमध्ये सुरू होऊ शकली नाही. परंतु आता या बाईकच्या डिलिव्हरीची कंपनीकडून सुरुवात झाली आहे. या बाईकमध्ये कोणत्या खास गोष्टी ग्राहकांना मिळणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
कंपनीने पहिल्याच दिवशी Kratos आणि Kratos R चे 20 युनिट्सची ग्राहकांना डिलिव्हरी केली आहेत. हे सर्व 20 युनिट्स कंपनीच्या पुणे मुख्यालयातून ग्राहकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. कंपनी टप्प्याटप्प्याने देशातील विविध शहरांमध्ये आपल्या वाहनांची विक्री सुरू करणार आहे. सध्या कंपनीने फक्त पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद आणि दिल्ली येथे आपल्या बाईक सादर केल्या आहेत.
जबरदस्त मिळते रेंज
Tork Kratos मध्ये 7.5kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जी 5.36 bhp पॉवर जनरेट करते. तसेच Kratos R मध्ये 9kW मोटर बसवण्यात आली आहे. जी 6 bhp पॉवर जनरेट करते. या दोन्ही मॉडेल्समध्ये 4kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. कंपनीने एका चार्जमध्ये 180 किमीपर्यंतची रेंज मिळण्याचा दावा केला आहे.
एक तासात होणार चार्ज
कंपनीने दावा केला आहे की, हे दोन्ही मॉडेल नियमित चार्जरवरून पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तास घेतात. यामध्ये रायडिंग मोडचे तीन पर्याय उपलब्ध आहेत. जे इको, सिटी आणि स्पोर्ट असे येतात. Kratos R फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. ज्यामुळे याची बॅटरी 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त एक तास लागतो.
फीचर्स
कंपनीने दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्समध्ये फाइंड माय व्हेईकल फीचर, मोटर वॉक, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, जिओ फेन्सिंग, असिस्ट, ट्रॅक मोड अॅनालिसिससह स्मार्ट चार्ज अॅनालिसिस सारखे फीचर्स दिले आहेत.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI