FASTag KYC :  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) वन व्हेईकल वन फास्टॅग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. NHAI चे उद्दिष्ट एकापेक्षा जास्त वाहनांसाठी समान FASTag वापरणे टाळणे आहे. एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग वापरण्यास बंदी घालण्याचाही प्रयत्न आहे. NHAI च्या सूचनेनुसार, FASTags ज्यांचे KYC पूर्ण नाही ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 31 जानेवारी नंतर ब्लॉक केले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना 31 जानेवारीपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 


जर तुमच्या FASTag चे KYC पूर्ण झाले नाही तर ते बॅन किंवा ब्लॅकलिस्ट केले जाईल. तुमच्‍या फास्‍टॅगचे केवायसी पूर्ण झालेल्‍याचे तुम्‍हाला माहिती नसेल, तर तुम्ही ते ऑनलाइन शोधू शकता.


>> FASTag KYC स्थिती कशी तपासायची?


- सर्वप्रथम https://fastag.ihmcl.com या वेब पोर्टलवर जा.


- त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा किंवा ओटीपी आधारित व्हेरिफिकेशन करा.


- एकदा लॉग इन केल्यानंतर, डॅशबोर्ड मेनूवर जा.
डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला My Profile हा पर्याय निवडा.


- पृष्ठावर My Profile दिसेल, ज्यामध्ये तुमची अपडेटेड  माहिती असेल.


- तुमचे केवायसी पूर्ण झाले असल्यास, तुम्हाला माहिती मिळेल.


> केवायसी कसे अपडेट करावे?


- माय प्रोफाइल पेजमध्ये तुम्हाला प्रोफाईल  सब सेक्शन दिसेल.


- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला  Customer Type निवडावा लागेल.


- यानंतर ओळखपत्र, निवासाचा पुरावा दाखवणारे  आवश्यक कागदपत्र सादर करावे लागेल.


- तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्ता पुरावा सादर करावा लागेल.


- यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.


> कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता?


- वाहन नोंदणी प्रमाणपत्र
- वाहनाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- वाहन मालकाची केवायसी कागदपत्रे


...नाहीतर 31 जानेवारीनंतर FASTag बंद होईल (FASTag will be Inactive After 31 January)


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी पर्यंत फास्टॅग केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसेल, तर ते 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करून घ्या. कारण, बँका KYC शिवाय फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येतील. यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट होणार नाही.


'हे' फास्टॅग हटवावे लागणार


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सांगितलं आहे की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी नवीन फास्टॅगचे केवायसी पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. यासोबतच 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' फॉलो करावे लागेल आणि त्यापूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग हटवावे लागतील. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI