How to Claim Car Insurance : गाडी अपघात (Car Accident) झाल्यानंतर इन्शुरन्स क्लेम (Insurance Claim) म्हणजे सर्वप्रथम विम्याचा दावा करणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही सहजपणे तुमची गाडी दुरुस्त करू शकाल. तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कारला अपघात झाला तर 7 ते 10 दिवसांच्या आत विम्याच्या दाव्यासाठी (Insurance Claim) अर्ज करणे गरजेचं आहे. इन्शुरन्स क्लेमसाठीच्या प्रक्रियेत मदतशीर ठरते. तुमचा कार इन्शुरन्स क्लेम सहज पास व्हावा असे तुम्हालाही वाटत असेल तर, क्लेम दाखल करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर माहिती घ्या.


अपघाताबाबत विमा कंपनीला कळवा


जेव्हा तुमच्या गाडीचा अपघात होतो, तेव्हा तुम्ही सर्वात आधी अपघाताची माहिती विमा कंपनीला देणं महत्त्वाचं आहे. विमा कंपनीला अपघाताची माहिती दिल्यानंतरच वाहन गॅरेज किंवा डीलरकडे नेले पाहिजे. यासोबत तुम्ही तुमची कार गॅरेजमध्ये जमा केल्याचा गॅरेजकडून पुरावा घ्या. तसेच, वाहनाच्या दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज घ्या आणि या खर्चाबाबच तुमच्या विमा कंपनीला माहिती द्या.


इन्शुरन्स क्लेमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती बिलाची माहिती द्या


अपघातानंतर वाहन दुरुस्त करण्यासाठी खर्च केलेल्या रकमेच्या बिलाचा तपशील इन्शुरन्स क्लेम फॉर्ममध्ये भरा. जर तुमच्या विम्यात अपघातामुळे झालेल्या दुखापतींचे संरक्षण समाविष्ट असेल, तर तुम्ही वैद्यकीय बिलांवरही इन्शुरन्स क्लेम करू शकता.


फायनल सेटलमेंट मिळाल्यानंतर प्रश्न विचारा


तुम्ही दावा केलेली रक्कम आणि विमा कंपनीने दिलेला दावा यामध्ये फरक आहे. या कारणास्तव, विमा कंपनीद्वारे कव्हर केलेले फायदे तुम्हाला मिळत असल्याची खात्री करा. विमा कंपनीकडून मानक दुरुस्ती दर आकारले जातात. यामुळे, तुम्ही नेहमी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला क्लेम शीटवरील प्रत्येक बाबीबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याची नोंदही तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI