BMW X3 M40i Review : प्रसिद्ध कार कंपनी BMW ने नुकतंच जगभरात आपलं नवीन मॉडेल लॉन्च केलं आहे. या नवीन मॉडेलचं नाव  X4 xDrive M40i असं ठेवण्यात आलं आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 96.20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कूप-एसयूव्ही सीबीयू युनिट म्हणून बाजारात आणली जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ही कार सिंगल ट्रिममध्ये उपलब्ध असेल. याबरोबरच या कारचे इंजिन नेमके कसे असेल? या कारची वैशिष्ट्ये आणि किंमत नेमकी किती असेल याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


BMW X4 M40i डिझाइन कसे असेल? 




BMW कारला, ग्रिल सराउंड, एक्झॉस्ट पाईप, विंडोच्या बाजूला ग्लॉस मॅट ब्लॅक ट्रीटमेंट मिळते. हे ब्लॅक सॅफायर आणि ब्रुकलिन ग्रे या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. याला स्टॅगर्ड टायर सेटअप मिळतो. ज्यामध्ये 245/45-R20 फ्रंट आणि 275/40-R20 मागील रन-फ्लॅट टायर असतात. याचे डबल-स्पोक अलॉय व्हील देखील ब्लॅक कलरचे आहेत आणि ब्रेक पॅडला रेड कॅलिपर देण्यात आले आहेत.


BMW X4 M40i वैशिष्ट्ये काय?




आतील भागात कार्बन-फायबर ट्रिम घटकांसह BMW चा Vernasca लेदर डॅशबोर्ड ब्लॅक किंवा रेड कलरमध्ये मिळतो. हे मॉडेल M पॅकेजसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये अद्वितीय पेडल्स, लेदर स्टीयरिंग व्हील आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर M-स्पेशल डिस्प्ले समाविष्ट आहे.


कारच्या इंटर्नल पार्टबद्दल बोलायचे झाल्यास, ट्विन जॉईन केलेल्या स्क्रीन्सचा हा नेहमीचा नवीन-जनरेशनचा BMW लेआउट नाही. पण, जेश्चर कंट्रोल, 3-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॅनोरॅमिक सनरूफ तसेच प्रीमियम ऑडिओ सिस्टम यांसारख्या वैशिष्ट्यांमध्ये पॅक करताना त्यात मोठा 12.3-इंचाचा डिस्प्ले आहे. 


इंजिन आणि मायलेज किती?




बीएमडब्ल्यू BMW चा दावा आहे की X4 M40i फक्त 4.9 सेकंदात 0-100kph वरून वेग वाढवू शकतो आणि त्याचा टॉप स्पीड 250 kph आहे. इंजिन 3.0-लिटर, 6-सिलेंडर टर्बो पेट्रोल आहे जे 360hp जनरेट करते. हे M340i सेडान पेक्षा किंचित कमी आहे. पण, केवळ 4.9 सेकंदांच्या 0-100 किमी/तास वेळेच्या मानाने कामगिरी मजबूत आहे


X3 M40i M340i पेक्षा अधिक महाग आहे. मात्र, कारचं इंजिन, आणि परफॉर्मन्स पाहता ही किंमत व्यवहारिक आहे.


कोणाशी स्पर्धा करणार? 


त्याची स्पर्धा Mercedes-AMG GLC 43 शी होईल, परंतु ती सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही. GLC 43 चे जागतिक मॉडेल नुकतेच अपडेट करण्यात आले आहे, जे भविष्यात भारतातही लॉन्च केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, BMW देखील M40i-सारखी X3 SUV ऑफर करते, ज्याची किंमत 87.7 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


India: काय आहे स्काय बस सर्व्हिस? भारतात लवकरच सुरू होणार सेवा; जाणून घ्या याबाबत सर्व काही


Car loan Information:

Calculate Car Loan EMI