Maruti Suzuki Dzire Tour S Recall: मारुती सुझुकीच्या डिझायर टूर एस कारमध्ये तांत्रिक बिघाड निदर्शनास आला आहे. यामुळे कंपनीने काही युनिट्स परत मागविल्याची माहिती आहे. याबाबत बुधवारी कंपनीकडून माहिती देण्यात आली. मारुती सुझुकीच्या डिझायर टूर ( Dzire Tour S) एस 6 ते 16 ऑगस्ट दरम्यान तयार केलेल्या परत मागवणार आहे. यामध्ये एकूण 166 डिझायर टूर कार आहेत. ज्यांची सुरक्षा वैशिष्ट्ये सदोष असल्याचे आढळून आले आहे. मारुती स्विफ्ट डिझायर टूर एस ही 1197 cc 5 सीटर कार आहे. दिल्लीत याची एक्स-शोरूम किंमत 6.05 लाख रुपये आहे. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 19.95 किमीपर्यंत मायलेज देते.


या गाड्यांमध्ये एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये दोष असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे कंपनीला ते बदलायचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ग्राहकांना या गाड्यांना मोफत दुरुस्तीसाठी परत बोलावणं पाठवलं आहे.


बदलीपूर्वी वाहन न चालवण्याचा सल्ला


काही एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय कंपनीला आहे. मात्र यामुळेच ते युनिट नीट काम करत आहे की नाही. हे तपासून पाहवं लगाणार आहे. तोपर्यंत कंपनीने ग्राहकांना त्यांच्या कारचे एअरबॅग कंट्रोल युनिट बदलेपर्यंत वाहन चालवू नये, अशी विनंती केली आहे.


परत मागवल्या जाणार्‍या कारची यादी पाहा


कंपनीच्या www.marutisuzuki.com या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या कारचे नाव रिकॉलमध्ये समाविष्ट केलेल्या मॉडेल्समध्ये आहे की नाही, हे शोधू शकता. साइटला भेट दिल्यानंतर, कार मालकाला 'Imp ग्राहक माहिती' ( Imp. Customer Info) विभागात जावे लागेल. येथे तुमच्या कारचा चेसिस क्रमांक टाकून तुम्ही तपासू शकता की त्यांचे वाहन देखील या रिकॉलमध्ये समाविष्ट केले गेले आहे की नाही. चेसिस क्रमांक MA3 नंतर 14 अंक आहेत आणि तो वाहनाच्या आयडी प्लेटवर आणि कारच्या इनव्हॉइस/नोंदणी कागदपत्रांवर देखील आहे.


रिकॉल व्यतिरिक्त जर आपण मारुतीच्या आगामी मॉडेलवर नजर टाकली, तर कंपनी पुढील महिन्यात आपल्या नवीन ग्रँड विटारा लॉन्च करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. ही एक मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह येणारे मॉडेल आहे. ज्यामध्ये तुम्हाला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. सध्या कंपनीने याचे बुकिंग सुरू केले आहे आणि आतापर्यंत 40,000 हून अधिक लोकांनी ही कार बुक केली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI