Honda Activa Smart: Honda Motorcycles and Scooters India ने या महिन्याच्या 23 तारखेला नवीन Honda Activa Smart लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. ही स्कूटर कंपनीच्या Activa ची स्मार्ट व्हर्जन असेल. सध्या Activa ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी पेट्रोल स्कूटर आहे. तरुणांमध्ये Activa ची एक वेगळीच क्रेझ आहे. यातच Honda Activa Smart येत असल्याने अनेक लोक ही स्कूटर इंटरनेटवर सर्च करत आहेत. याबद्दल अधिक माहिती अजनून घेऊ...
Honda Activa Smart: काय असेल नवीन?
नवीन Honda Activa Smart चे वजन सध्याच्या Activa च्या स्टॅंडर्ड आणि DLX पेक्षा सुमारे 1 किलो कमी आहे. सध्या कंपनीने या स्कूटरबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही. त्याबद्दलची संपूर्ण माहिती लॉन्चच्या वेळीच उपलब्ध होईल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या याच्या व्हेरियंटमध्ये बसवलेले इंजिन 7.79 एचपी पॉवर जनरेट करते. तर 7.84 एचपीची पॉवर नवीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
Honda Activa Smart: नवीन स्कूटरमध्ये काय असेल स्मार्ट?
या स्कूटरच्या नावात स्मार्ट हा शब्द नवीन Anti-Theft System साठी असू शकतो, जो या नवीन स्कूटरमध्ये दिला जाऊ शकतो. ही होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टीम किंवा H.I.S.S ची परवडणारा व्हर्जन असू असतो. जी कंपनीच्या महागड्या बाईकमध्ये आढळते. या नवीन अँटी थेफ्ट सिस्टमने सुसज्ज असलेली ही स्कूटर शाईन सारख्या होंडा बाईकच्या रांगेत सामील होऊ शकते.
TVS Jupiter शी करेल स्पर्धा
ही नवीन Honda स्कूटर टीव्हीएस ज्युपिटरशी स्पर्धा करेल, ज्याची प्रारंभिक किंमत 73,097 रुपये आहे आणि याचा टॉप मॉडेल 87,923 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. ही स्कूटर 6 प्रकार आणि 16 रंगांचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. टीव्हीएस ज्युपिटरमध्ये 109.7cc BS6 इंजिन आहे, जे 7.77 bhp पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम मिळते. या स्कूटरचे वजन 107 किलो आहे आणि याची इंधन टाकी क्षमता 6 लीटर आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI