Car Servicing Tips : आपल्या घरात जर कार (Car) किंवा बाईक (Bike) असेल, तर त्याची वेळोवेळी काळजी घेणे आणि त्यांची सर्व्हिसिंग करणे किती गरजेचे असते, हे आपल्याला माहितच आहे. वेळच्या वेळी गाड्यांची सर्व्हिसिंग केल्याने त्यांच्यात अचानक बिघाड होत नाही. अनेकदा आपण गाडीची सर्व्हिस योग्य वेळी करणे विसरून जातो. अशावेळी सर्व्हिसिंगला देखील खर्च जास्त होतो. अनेक लोक अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी सर्व्हिस न करता लोकल मेकॅनिककडून आपली गाडी सर्व्हिस करून घेतात.


कधी कधी लोकल मेकॅनिककडून कार सर्व्हिस करून घेताना नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत, लोकल मेकॅनिककडून कार सर्व्हिस करून घेत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.


सस्पेंशन


लोकल मेकॅनिककडून कारची सर्व्हिसिंग करून घेताना, गाडीचे सस्पेंशन व्यवस्थित तपासा. कारण बहुतेक लोकल मेकॅनिक गाडीच्या सस्पेंशनकडे विशेष लक्ष देत नाहीत. व्यवस्थित सर्व्हिसिंग न झाल्यास तुमच्या गाडीचे सस्पेंशन अचानक तुटू शकते. अशा अचानक उद्भवणाऱ्या समस्येला टाळण्यासाठी, आधीपासूनच गाडीच्या सस्पेंशनची दुरुस्ती करून घ्यावी.


इंजिन ऑईल


गाडीची सर्व्हिसिंग करताना इंजिन ऑईल तपासणे अधिक गरजेचे आहे. गाडीच्या अधिक दमदार पर्फोर्मंससाठी नियमावलीनुसार शिफारस केलेले इंजिन ऑईल वापरा. पैसे वाचवण्यासाठी कोणतेही स्वस्तातले इंजिन ऑईल विकत घेऊ नका, अन्यथा तुमच्या गाडीचे इंजिन खराब देखील होऊ शकते.


ब्रेक ऑईल


आपल्या कारसाठी नेहमी ब्रँडेड ब्रेक ऑईल वापरा. लोकल मार्केटमध्ये मिळणारे ब्रेक ऑईल वापरणे टाळा, जेणेकरून तुमच्या वाहनाच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण गाडी चालवताना ब्रेकची भूमिका खूप महत्वाची असते. लोकल मार्केटमध्ये मिळणारे स्वस्तातले ब्रेक ऑईल वापरल्यास ब्रेक खराब होऊ शकतात. अशावेळी ब्रेक अडकण्याची किंवा नादुरुस्त होण्याची शक्यता देखील असते.


बॅटरी


कारमध्ये कधीही लोकल बॅटरीचा वापर करूनका.  नेहमी चांगली आणि ब्रँडेड बॅटरी वापरा. कारण लोकल बॅटरी अचानक खराब होऊन तुमच्यासमोर अनेक समस्या निर्माण करून शकते. लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या बॅटरीचे आयुष्य देखील कमी असते. कार सुरळीत चालण्यासाठी बॅटरीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे चांगली बॅटरी वापरणे आवश्यक असते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन


Car loan Information:

Calculate Car Loan EMI