Honda Activa 6G H Smart Vs TVS Jupiter: होंडाने (Honda) देशांतर्गत ऑटो मार्केटमध्ये (Indian Auto Industry) आणखी एक स्मार्ट स्कूटर सादर केली आहे. यामुळे नवीन स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. असं असलं तरी देशातील वाहन बाजारात आधीच अनेक स्कूटर उपलब्ध असल्याने, नेमकी कोणती स्कूटर खरेदी करावी यावरून गोंधळ होणे सामान्य आहे. यातच आज आपण टीव्हीएस ज्युपिटर आणि होंडाच्या नवीन स्कूटरची तुलना करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला यातली सर्वोत्तम स्कूटर निवडण्यात मदत होय शकले. चला तर जाणून घेऊ कोणती स्कूटर आहे बेस्ट....


Honda Activa 6G H Smart Vs TVS Jupiter: किंमत 


दोन्ही स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Honda ची नवीन स्कूटर Activa 6G H Smart ची एक्स शोरूम किंमत 80,537 रुपये आहे. तर TVS Jupiter ची प्रारंभिक किंमत 69,990 (एक्स-शोरूम) रुपये आहे. म्हणजेच TVS ज्युपिटर नवीन Honda Activa H स्मार्ट स्कूटरपेक्षा सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त आहे.


Honda Activa 6G H Smart Vs TVS Jupiter: इंजिन 


इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन Honda Activa स्कूटरमध्ये 109.51 cc चे इंजिन आहे. जे 7.84 PS पॉवर आणि 8.90 NM टॉर्क देते. तर TVS ज्युपिटरमध्ये 109.7 cc इंजिन उपलब्ध आहे. जे 7.88 PS चा पॉवर आणि 8.8 NM टॉर्क देते. इंजिनच्या बाबतीत दोन्ही स्कूटर जवळपास सारख्याच आहेत.


Honda Activa 6G H Smart Vs TVS Jupiter: मायलेज 


मायलेजच्या बाबतीत, Honda त्याच्या Honda Activa 6G H स्मार्ट स्कूटरसाठी 60 km/l मायलेजचा दावा करते. दुसरीकडे TVS त्याच्या ज्युपिटर स्कूटरसाठी 64 किमी/ली मायलेजचा दावा करते. कंपनीच्या दाव्यानुसार, टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर मायलेजच्या बाबतीत होंडा अॅक्टिव्हा स्कूटरपेक्षा पुढे आहे.


Honda Activa 6G H Smart Vs TVS Jupiter: फीचर्स


फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Honda च्या नवीन Activa 6G H स्मार्ट स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अॅनालॉग स्पीडोमीटर, ACG सह सायलेंट स्टार्ट, इंजिन स्टार्ट स्विच, ESP टेक्नॉलॉजी, एलईडी हेड लाईट, अॅनालॉग ओडोमीटर, स्मार्ट की, एच स्मार्ट, एलईडी टेल लाईट यासारखे फीचर्स आहेत. एलईडी टर्न सिग्नल लाईट आणि लो फ्यूल इंडिकेटर उपलब्ध आहे.


दुसरीकडे टीव्हीएस ज्युपिटर स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, नेव्हिगेशन, कॉल एसएमएस अलर्ट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्मार्ट एक्स कनेक्ट, टीव्हीएस इंटेलिगो, इकोनोमीटर, डिजिटल क्लॉक, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, इंटेलिजेंट इग्निशन सिस्टम, व्हॉइस असिस्ट सारखे फीचर्स आहेत.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI