Hero Bikes: देशाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या  Hero XPulse 200 2V बाईकचे उत्पादन बंद केलं आहे. कंपनीने ही बाईक आपल्या अधिकृत वेबसाइटवरून ही काढून टाकली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनी  या मॉडेलच्या जागी दुसरी बाईक आणू शकते. ही बाईक का बंद झाली आणि ती कोणत्या बाईकने बदलली जाऊ शकते, हे जाणून घेऊ...


Hero XPulse 200 2V डिझाइन


डिझाईनच्या बाबतीत बाईकला टीयर ड्रॉप आकाराची इंधन टाकी, सिंगल-पीस सीट, ग्रॅब रेल आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट सिस्टमसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी हेडलाइट आणि एलईडी टेललाइट मिळते. याशिवाय फ्रंट स्पोक व्हील 21 इंच आणि बॅक स्पोक व्हील 18 इंच आहे.


फीचर्स 


हीरो बाईकमध्ये 199.6cc इंजिन आहे. जे जास्तीत जास्त 17.8hp पॉवर आणि 16.45Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. रस्त्यांवर उत्तम राइड आणि हाताळणीसाठी, याला सिंगल-चॅनल ABS सह पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक मिळतात. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर याला पुढच्या बाजूला Inverted forks आणि मागच्या बाजूला मोनो-शॉक युनिट्स मिळतात.


हिरो आपली XPulse 200 2V बाईक कंपनीची स्वतःची आगामी बाईक Hero XPulse 421 बाईकसह बदलू शकते. या नवीन बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना अपडेटेड पेंट जॉब, 4-व्हॉल्व्ह स्टिकर डिझाइनसह इंधन टाकी, सिंगल-पीस सीट, पिलर ग्रॅब रेल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी हेडलाइट टेललाइटसह अपस्वेप्ट एक्झॉस्ट सिस्टम मिळेल. याच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाल्यास, याला समोरील बाजूस इनव्हर्टेड फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक युनिट मिळू शकते.


इंजिन आणि किंमत 


या Hero बाईकमध्ये नवीन 421cc इंजिन दिसू शकते. जी जास्तीत जास्त 27.8hp पॉवर आणि 32.45Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनसह जोडले जाऊ शकते. याची किंमत आणि उपलब्धता याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI