Affordable Adventure Bikes: भारतात अॅडव्हेंचर बाईक खूप पसंत केल्या जातात. मात्र या बाईकच्या किंमती अधिक असल्याने अनेक जणांना या बाईक खरेदी करणं परवडत नाही. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अॅडव्हेंचर टूरिंग बाईक्स लोक आराम आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विकत घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकप्रिय अॅडव्हेंचर बाईकबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमतही खूप कमी आहे.


Hero XPulse 200 4V


Xpulse 200 4V बाईकला 199.6 cc, इंधन-इंजेक्‍ट, एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन मिळते. जे 8,500 rpm वर 18.04 PS पॉवर आणि 6,500 rpm वर 16.45 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात समोर 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स, प्रीलोड अॅडजस्टेबल रीअर मोनोशॉक सस्पेंशन आणि सिंगल-चॅनल ABS सह पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक मिळतात. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपये आहे.


होंडा CB 200X


Honda CB200X ही अॅडव्हेंचर टूरिंग व्हर्जनमध्ये हॉर्नेट 2.0 नेकेड म्हणून बाजारात आणली गेली आहे. या बाईकमध्ये 184.4 cc सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. जे 8500 rpm वर 17 PS चा पॉवर आणि 6000 rpm वर 16.1 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याला मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशनसह समोर USD फोर्क्स मिळतात. यासोबतच ऑल-एलईडी लाइटिंग, नकल गार्ड, स्प्लिट-सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर-कॉल आणि व्हिझर देखील उपलब्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.49 लाख रुपये आहे.


Suzuki V-Strom SX : सुझुकी व्ही-स्ट्रॉम एसएक्स


सुझुकीच्या Gixxer 250 प्लॅटफॉर्मवर आधारित, V-Strom SX ला 249cc, ऑइल-कूल्ड इंजिन मिळते. जे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले 26.5 PS पॉवर आणि 22.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात समोर टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप प्रीलोड अ‍ॅडजस्टॅबिलिटीसह मोनोशॉक सस्पेंशन आहे. ABS सह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.12 लाख रुपये आहे.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Cheapest Mahindra Thar : सर्वात स्वस्त Mahindra Thar भारतात लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत आणि फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI