Tata Ace EV: देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) सोमवारी नवीन Ace EV Ace EV ची (electric vehicle) डिलिव्हरी सुरू केली आहे. यासह कंपनीने शहरांतर्गत माल वाहतुकीसाठी शाश्वत वाहतूक उपाय प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Ace EV हे भारतातील सर्वात अॅडव्हान्स, zero-emission, छोटे चारचाकी व्यावसायिक वाहन आहे. Ace EVs चा पहिला ताफा ई-कॉमर्स, एफएमसीजी व कुरियर कंपन्यांना आणि त्यांचे लॉजिस्टिक्स सेवा प्रदाते: Amazon, DHL (एक्सप्रेस आणि सप्लाय चेन), FedEx, Flipkart, Johnson & Johnson Consumer Health, Moving, Safeexpress आणि ट्रेंट लिमिटेड यांना डिलिव्हर करण्यात आला आहे.
मे 2022 मध्ये हे वाहन सादर करण्यात आले होते. नवीन Ace EV त्याच्या वापरकर्त्यांच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे. या वाहनाने अनेक टेस्ट यशस्वीपणे पार केल्या आहेत. Ace EV ही कार्गो मोबिलिटीसाठी सर्वांगीण सोल्यूशन आणि 5 वर्षांचे सर्वसमावेशक मेन्टेनन्स पॅकेजसह येते. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, 100 टक्के अपटाइमसह याच्या दमदार कामगिरीला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. Ace EV च्या सपोर्टिंग इकोसिस्टममध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, जास्तीत जास्त फ्लीट अपटाइमसाठी समर्पित इलेक्ट्रिक व्हेईकल सपोर्ट सेंटर्सची स्थापन करणे, टाटा फ्लीट एज स्थापन करणे, संबंधित टाटा ग्रुप कंपन्यांची प्रमाणित सक्षम इको-सिस्टम टाटा युनिईव्हीर्सचा पाठिंबा आणि निधीसाह्यसाठी देशातील आघाडीच्या फायनान्शियर्ससोबत सहयोगांचा समावेश आहे.
पॉवर आणि रेंज
Tata Ace EV हे टाटा मोटरचे EVOGEN पॉवरट्रेन मिळवणारे पहिले उत्पादन आहे. जे 154 किमीची प्रमाणित रेंज देते. नवीन मॉडेल अॅडव्हान्स बॅटरी कूलिंग सिस्टम आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह सुरक्षित आणि प्रत्येक वातावरणात हे वाहन चालणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हाय अपटाइमसाठी वाहन रेगुलर आणि फास्ट चार्जिंग दोन्ही सपोर्ट सिस्टिमसह येते. यात 27kW (36bhp) मोटर मिळते. जी 130Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. Tata Ace EV मध्ये 208 क्यूबिक फूट किंवा 3332.16 kg/क्यूबिक मीटर कार्गो व्हॉल्यूम आणि 22 टक्के ग्रेड-क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI