Auto Sector : ऑटो सेक्टरसाठी (Auto Sector) केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी ऑटो पीएलआयसाठी निवडलेल्या कंपन्यांची नावे जाहीर केली. सुमारे 95 कंपन्यांना ऑटो पीएलआयची मान्यता मिळाली आहे. यामध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडिया आणि हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) सारख्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

ऑटो मोबाईल आणि वाहन घटकांसाठी सुरू करण्यात आलेली पीएलआय योजना खूप यशस्वी ठरली आहे आणि तिला 74,850 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, तर सरकारने 42,500 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव तयार केले आहेत जे 5 वर्षात साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे असं  अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे.

एकूण 95 कंपन्यांच्या अर्जांना मंजुरी

सरकारने एकूण 95 कंपन्यांचे अर्ज मंजूर केले आहेत. त्यापैकी वाहन घटकांसाठी 75 कंपन्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. भारत फोर्ज, सोना BLW प्रिसिजन फोर्जिंग, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम, टाटा कमिन्स, टाटा फिकोसा ऑटोमोटिव्ह सिस्टम्स, द हाय-टेक गीअर्स, टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया आणि टोयोटा किर्लोस्कर या कंपन्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ऑटो कंपोनंटस्च्‍या उत्पादनात अद्याप गुंतलेल्या नसलेल्या अशा 2 कंपन्यांना ऑटो पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामध्ये टायर बनवणारी खासगी कंपनी सिएट आणि सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या नावांचा समावेश आहे.

‘कंपोनेंट चॅम्पियन इंसेंटिव स्कीम ‘

पीएलआय योजना अंतर्गत मान्यता मिळालेल्या कंपन्यांनी 'कंपोनंट चॅम्पियन इन्सेंटिव्ह स्कीम' अंतर्गत 29,834 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी मंत्रालयाने ऑटो मोबाइल उत्पादनाशी संबंधित PLI योजनेअंतर्गत 20 ऑटो मोबाइल कंपन्यांच्या अर्जाला मंजुरी दिली होती. यामध्ये टाटा मोटर्स, सुझुकी मोटर गुजरात, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई आणि किया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्या म्हणण्यानुसार पीएलआय योजनेचे मोठे यश हे भारताचे जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र बनण्याचा उद्योगांना आत्मविश्वास असल्याचे द्योतक आहे. यामुळे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI