Tata Avinya First Look: टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत एकामागून एक उत्तम इलेक्ट्रिक कार सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. Tata ने 29 एप्रिल 2022 रोजी भारतात एक नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार Tata Avinya Electric सादर केली होती. कंपनीने या कारबद्दल दावा केला आहे की, ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चरवर आधारित असेल. टाटाची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे, जी एकाच महिन्यात सादर करण्यात आली आहे. कंपनीने याआधी इलेक्ट्रिक कार Curvv Coupe मध्ये सादर केली.


Tata Avinya Features


फीचर्सच्या बाबतीत ही कार उत्तम सिद्ध होऊ शकते. कंपनी यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्याची शक्यता आहे. याच्या लूक टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्ससारखा दिसतो. या इलेक्ट्रिक कारच्या इंटिरिअरवरही खूप लक्ष देण्यात आले आहे. यात प्रीमियम, फ्युचरिस्टिक आणि प्रशस्त केबिन देखील मिळते. यामध्ये स्टीयरिंग माउंटेड डिस्प्ले, प्रीमियम इंटीरियर ट्रिम आणि अपहोल्स्ट्री सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे याची ड्रायव्हरची सीट हलवता येते. केबिनमध्ये पुरेसा नैसर्गिक प्रकाश राहील अशा पद्धतीने कारचे डिझाइन ठेवण्यात आले आहे. इतकंच नाही तर जबरदस्त इंटीरियरसोबतच याचे एक्सटीरियरही खूप चांगले आहे. 


Tata Avinya Range 


टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल्सचे बिझनेस प्रेसिडेंट शैलेश चंद्र यांच्या मते, AVINYA वर आधारित जनरेशन-3 EV 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. जनरेशन 1 आणि जनरेशन 2 प्लॅटफॉर्मच्या तुलनेत नवीन Gen 3 प्लॅटफॉर्म EV स्पेसमध्ये चांगले काम करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही इलेक्ट्रिक कार 2025 पर्यंत लॉन्च केली जाईल.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI