Electric Vs Hybrid Cars : इलेक्ट्रिक की हायब्रिड कार? कोणती कार खरेदी करणं चांगलं? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Electric Vs Hybrid Cars : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही हायब्रीड वाहने वाहनांपेक्षा महाग आहेत. तसेच इलेक्ट्रिक कारला हायब्रीड कारपेक्षा कमी रेंज मिळते.

Continues below advertisement

Electric Vs Hybrid Cars : अलिकच्या काळात ग्राहकांची इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल असल्याचं दिसून येतंय. त्याचवेळी हायब्रिड कारच्या विक्रीमध्येही मोठी वाढ दिसून येतेय. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांमध्ये काय फरक आहे किंवा कोणती खरेदी करणे चांगले आहे. दोन्ही वाहने पर्यावरणपूरक आहेत. दोन्ही वाहने आपापल्या ठिकाणी सर्वोत्तम आहेत. लोक त्यांच्या गरजेनुसार दोनपैकी एक कार खरेदी करू शकतात.

Continues below advertisement

काय फरक आहे? 

इलेक्ट्रिक वाहने विजेवर चालतात. या वाहनांमध्ये पेट्रोल, इंजिनची सुविधा दिलेली नाही. दुसरीकडे हायब्रीड वाहने गॅसोलीन आणि वीज दोन्हीवर चालण्यास सक्षम आहेत. हायब्रिड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह गॅसोलीन इंजिन असते. इलेक्ट्रिक मोटरचा वापर कमी वेगासाठी केला जातो तर गॅसोलीनचा वापर लांब प्रवासासाठी किंवा उच्च गतीच्या प्रवासासाठी केला जातो.

चार्जिंगमध्ये फरक काय? 

हायब्रिड वाहने आपोआप चार्ज होतात. ही वाहने रिजनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे त्यांच्या बॅटरी चार्ज करतात. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी आउटलेटमध्ये प्लग इन करावे लागते. ही वाहने घरी किंवा कोणत्याही सार्वजनिक चार्जिंग स्पॉटवर चार्ज करता येतात.

रेंजमध्येही फरक

हायब्रीड वाहने इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा अधिक रेंज देतात. कारण हायब्रिड वाहनांना पेट्रोल इंजिन बसवलेले असते. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांची रेंज कमी असते. जरी कंपन्यांनी त्यांची श्रेणी मोठ्या प्रमाणात वाढविली असली तरी ती अद्याप हायब्रीडपेक्षा कमी आहे.

किंमत कुणाची स्वस्त? 

हायब्रीड वाहने इलेक्ट्रिक कारपेक्षा स्वस्त आहेत. येत्या काही कालावधीत इलेक्ट्रिक वाहने देखील स्वस्त होऊ शकतात. एवढेच नाही तर केवळ पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत हायब्रीड वाहनांमुळे कमी प्रदूषण होते. तर इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात.

अशा स्थितीत दोन्ही वाहने आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. ग्राहकाला कोणती कार घ्यायची आहे हे त्याच्या गरजांवर अवलंबून असते.

ही बातमी वाचा: 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola