Upcoming SUV Hyundai Tucson : ऑटोमेकर कंपनी Hyundai लवकरच भारतीय बाजारात नवीन SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही SUV नवीन कारची जनरेशन Hyundai Tucson असणार आहे. या संदर्भात अधिकृत माहिती कंपनी 13 जुलै रोजी देणार आहे. जेव्हा या कारचे अनावरण होईल.    


सध्याच्या मॉडेलपेक्षा ही कार किती वेगळे असेल?


आगामी Hyundai SUV Hyundai Tucson 2022 मध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक अपडेट्स दिले गेले आहेत. तसेच, ही कंपनीच्या भारतातील प्रमुख SUV पैकी एक असेल. डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आगामी टक्सनमध्ये Hyundai ची Sensuous Sporty Design Language या आगामी Tucson मध्ये दिसणार आहे.


Hyundai Tucson मध्ये हे फीचर्स असतील :


Hyundai Tucson मध्ये स्पोर्टी स्टायलिंग लूक देणारी आहे. जसे की, प्रमुख बॉडी लाइन्स, मॅसिव्ह मशीन-कट अलॉय व्हील आणि स्लोपिंग रूफलाइन मिळतील. आगामी कारला मागील बाजूस इंटिग्रेटेड स्पॉयलर आणि कनेक्टिंग बारसह ऑल-एलईडी टेललॅम्प्स मिळतील. हे आतून Hyundai Tucson च्या जागतिक मॉडेलसारखे असेल. ही आगामी नवीन SUV कारमध्ये फीचर्स असतील. 


इंजिन :  


Hyundai Tucson दोन पेट्रोल, एक हायब्रिड आणि एक ऑइल-बर्नर इंजिनसह जागतिक स्तरावर ऑफर केली जाईल. पण, भारत-स्पेक मॉडेलमध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. याशिवाय, 8-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर AT सह 2.0-लिटर डिझेल इंजिन दिले जाण्याची अपेक्षा आहे. 


Hyundai ने नुकतीच आपली मिड-साईज कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue अपडेटेड व्हर्जनसह लॉन्च केली आहे. लॉन्च केल्यानंतर या एसयूव्हीला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन एसयूव्हीचे डिझाईन आणि वैशिष्ट्ये लोकांना आकर्षित करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कारची सुरुवातीची किंमत 7.53 लाख आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल 9.99 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहेत.


ही मध्यम आकाराची प्रीमियम SUV Citroen C5 Aircross आणि Jeep Compass शी स्पर्धा करणार आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI