Renault Upcoming Cars: वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट इंडिया (Renault India) आपली लोकप्रिय एसयूव्ही रेनॉल्ट डस्टर (Renault Duster) लवकरच भारतात नव्या अवतारात लॉन्च करणार आहे. रेनॉल्ट ही कार नवीन नावाने लॉन्च करू शकते. नवीन लूकसोबतच या कारमध्ये अनेक फीचर्स अपडेट्सही पाहायला मिळतील, असं बोलले जात आहे.


नवीन डस्टर CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल


रेनॉल्ट आपली नवीन डस्टर कंपनीचे CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्म बनवेल. या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या कार सुरक्षितता आणि आरामासह मजबूत आणि पॉवरफुल बॉडीसह येतात. नवीन डस्टरचा पुढील आणि मागील लूक पूर्णपणे रीडिझाइन केला जाईल. नवीन SUV मध्ये हवेशीर जागा, वायरलेस चार्जर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटोमॅटिक एअर कंट्रोल, एअर प्युरिफायर, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टिपल एअरबॅग्ज आणि हिल होल्ड सारखे फीचर्स यात मिळतील.


नवीन डस्टर इंजिन


रेनोने ही एसयूव्ही 2012 मध्ये देशात लॉन्च केली होती. तेव्हापासून या कारचे कोणतेही अपडेट करण्यात आलेले नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन डस्टरला 1.2L पेट्रोल इंजिन मिळेल. तसेच त्यात हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्यायही पाहता येईल. तसेच कंपनी ही कार इलेक्ट्रिक अवतारात देखील लॉन्च करू शकते. ही नवीन कार भारतातील Skoda Kushak, Kia Seltos, Mahindra XUV700, Tata Harrier आणि Hyundai Creta सारख्या SUV ला टक्कर देईल.


दरम्यान, देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. हे पाहता सर्व वाहन कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच रेनॉल्ट इंडियानेही आपल्या कारवर मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत, ट्रायबर Kwid आणि Kyger कारच्या खरेदीवर ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Renault Kwid वर कंपनी 10,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 15,000 रुपयांच्या ऑफर एक्सचेंज बेनिफिटच्या रूपात मिळत आहेत. अशा प्रकारे या वाहनाच्या खरेदीवर जास्तीत जास्त 35,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.अशाच पद्धतीने कंपनी आपल्या अनेक कारवर मोठी सूट देत आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI