Citroen Cars: फ्रेंच कार निर्माता Citroen आपली कॉम्पॅक्ट SUV जागतिक बाजारपेठेत सादर करण्यास तयार आहे. ज्यासाठी कंपनीने 27 एप्रिलला आधीच घोषणा केली आहे. लॉन्च झाल्यानंतर ही कार भारतातील क्रेटा आणि किया सेल्टोस सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल. ही SUV नुकतीच टेस्टिंग दरम्यान दिसली होती, ज्यामुळे ती लवकरच भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. Citroen ही चौथी कार आहे, जी देशात दाखल होणार आहे. 


Citroen Cars: डिझाइन


Citroen ची ही कॉम्पॅक्ट SUV कंपनीच्या स्वतःच्या ग्लोबल मॉडेल कार C3 Aircross वर आधारित असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही कार 5 आणि 7 सीट ऑप्शनसह सादर करू शकते, परंतु भारतात तिचा 7 सीटर पर्याय लॉन्च करण्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच याची लांबी भारतातील इतर SUV प्रमाणे 4 मीटरपेक्षा जास्त असू शकते. डिझाइनच्या बाबतीत, ही कार जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणार्‍या कंपनीच्या C3 एअरक्रॉसपेक्षा वेगळी असू शकते. तसेच भारतात विकल्या जाणार्‍या C3 हॅचबॅकपेक्षा जास्त प्रीमियम मिळण्याची अपेक्षा आहे.


Citroen Cars: केबिन फीचर्स 


मिळालेल्या माहितीनुसार, याच्या अंतर्गत फीचर्समध्ये एक पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड दिसू शकतो. तसेच त्याच्या मध्यभागी एक स्टँडिंग इन्फोटेनमेंट टच स्क्रीन सिस्टम दिली जाऊ शकते. यामध्ये दिलेला डिस्प्ले C3 हॅचबॅक आणि त्याच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंट eC3 पेक्षा वेगळ्या पद्धतीने देखील पाहिला जाऊ शकतो. याशिवाय यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा, अलॉय व्हील्स, ऑटो डिमिंग ओआरव्हीएम फीचर, मोठा पॅनोरामिक सनरूफ यांसारखी फीचर्स या एसयूव्ही कारमध्ये पाहता मिळू शकतात.


Citroen Cars: इंजिन


Citroen  या SUV मध्ये 1.2L टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन देऊ शकते, जे यास 110bhp पॉवर आणि 190Nm पीक टॉर्क देण्यास सक्षम असेल. ट्रान्समिशनसाठी, ते 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसमध्ये जोडले जाऊ शकते.


या कारशी होणार स्पर्धा 


भारतात याची स्पर्धा क्रेटा आणि किया सेल्टोसशी होणार आहे. यातच Creta SUV चा N-Line Night Edition नुकताच लॉन्च करण्यात आल आहे. ही लिमिटेड एडिशन कार आहे. कंपनी याचे फक्त 900 युनिट्सची विक्री करणार आहे. या कारची किंमत BRL 181,490 (म्हणजे सुमारे 29 लाख रुपये) आहे. हा नवीन एडिशन Creta च्या फेसलिफ्ट मॉडेलवर आधारित आहे, जो भारतात 2024 साली लॉन्च होणार आहे. ब्लॅक-आउट ग्रिल, अलॉय व्हील्स, लोगो आणि डोअर हँडल क्रेटा एन-लाइन नाईट एडिशनमध्ये ब्लॅक पेंट स्कीमसह ही कार सादर करण्यात आली आहे. यासोबतच हेडलाइट्स आणि टेललाइट्सनाही स्मोकर ट्रीटमेंट देण्यात आली आहे. ही कार दिसायला खूप आकर्षक आहे. यासोबतच यात 18 इंची अलॉय व्हील्सही देण्यात आले आहेत.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI