Mahindra Thar 2WD launch on January 9: गेल्या अनेक दिवसांपासून लोक ज्याची वाट पाहत होते अखेर तो दिवस आला आहे. महिंद्रा आपली सर्वात स्वस्त थार 2WD म्हणजेच रिअल व्हील ड्राइव्ह मॉडेल आज (9 जानेवारी) लॉन्च करणार आहे. असे बोलले जात आहे की, हे ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केले जाईल. मात्र आता ही कार याच्या दोन दिवस आधी म्हणजे आजच लॉन्च केले जाणार आहे. मात्र कंपनीने या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यापूर्वी या ऑफ-रोड एसयूव्हीचा रंग आणि इंटेरिअरचे तपशीलही समोर आले आहेत. तसेच या कारचा गोल्ड कलरचा फोटोही समोर आला आहे. एका रिपोर्ट्सनुसार, याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
Mahindra Thar 2WD launch on January 9: AX Opt आणि LX प्रकारमध्ये होणार उपलब्ध
टू-व्हील ड्राइव्ह सिस्टीम थार 2WD मध्ये उपलब्ध असेल. हे नवीन डिझेल इंजिनसह लॉन्च केले जाईल. लीक झालेल्या तपशीलांनुसार, ही SUV ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट अशा दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय एक्वामेरीन, नेपोली ब्लॅक, रेड रेज आणि गॅलेक्सी ग्रे रंगाचे पर्यायही उपलब्ध असतील. हे 2WD मॉडेल AX Opt आणि LX या प्रकारांमध्ये लॉन्च केले जाईल. यामध्ये काही फीचर्स देखील दिले जातील, जे तुम्हाला फोर व्हील ड्राइव्हमध्ये देखील मिळतात. यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), इलेक्ट्रिक आऊट रीअर व्ह्यू मिरर (ORVM's), फॉग लॅम्प्स, क्रूझ कंट्रोल, रूफ माऊंटेड स्पीकर आणि टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देखील मिळेल.
Mahindra Thar 2WD launch on January 9: 1.5-लिटर डील इंजिन मिळेल
मिळालेल्या माहितीनुसार, यात 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. जे 3,500 rpm वर 118 bhp ची कमाल पॉवर आणि 1,750-2,500 rpm वर 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनी Marazzo मध्ये देखील हे इंजिन वापरत आहे. याच्या इतर इंजिन पर्यायामध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. जे 152hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. तसेच 320Nm टॉर्कसह एक स्वयंचलित गियरबॉक्स देखील पर्यायामध्ये उपलब्ध आहे. याचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Mahindra Thar 2WD launch on January 9: 2WD मध्ये एंट्री लेव्हल व्हेरिएंट देखील असेल
कंपनीने थार 2WD वर सेंटर कन्सोलमध्ये नवीन ऑटो स्टार्ट/स्टॉप कार्यक्षमता आणि लॉक/अनलॉक बटण जोडले आहे. यामध्ये 4×4 बॅजिंग दिसणार नाही. हे मॉडेल 4WD सारखे असेल. अशी चर्चा आहे की, नवीन थार 2WD चे एंट्री-लेव्हल व्हेरियंट देखील असेल. लहान इंजिनमुळे आणि फोर-व्हील ड्राइव्ह प्रणाली नसल्यामुळे, महिंद्र थार 2WD ची किंमत खूप कमी असू शकते. सध्या थारची किंमत 13.58 लाख ते 16.28 लाख रुपये आहे. मात्र नवीन थारची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असेल असे मानले जात आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI