Cheapest Sunroof Car: अलीकडेच सनरूम असलेलया कारचा ट्रेड खूप वाढताना दिसत आहे. सनरूम असलेल्या कारची किंमत ही इतर कारच्या तुलनेत अधिक असते. अशातच तुम्ही जर कमी खर्चात सनरूम असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त सनरूम कारबद्दल माहिती सांगणार आहोत. यामध्ये Mahindra XUV300, Ford EcoSport, Hyundai Venue, Kia Sonnet आणि Tata Nexon सारख्या कारचा समावेश आहे.


टाटा नेक्सन (TATA Nexon)


Tata Nexon XM(S) मध्ये सनरूफ देण्यात आला आहे. या कारची किंमत सुमारे 8.86 लाख रुपये आहे. यात ऑटो-फोल्डिंग बाहेरील रिव्हिव्ह रिअर व्ह्यू मिरर, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प आणि 4-स्पीकर हरमन साउंड सिस्टीम यांसारखी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. 


किआ सोनेट (Kia Sonet)


Kia Sonet ही एक एसयूव्ही कार आहे. यात सनरूफ फीचर देखील देण्यात आले आहे. या कारच्या HTX प्रकारात सनरूफ उपलब्ध आहे. याची किंमत सुमारे 8.70 लाख रुपये आहे. ही कार वेन्यू प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.


ह्युंदाई आय 20 (Hyundai i20)


जुन्या Hyundai i20 मध्ये सनरूफ नव्हते. मात्र, नवीन पिढीच्या Hyundai i20 मध्ये सनरूफ देण्यात आला आहे. सनरूफसह Hyundai i20 ची किंमत सुमारे 9.4 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue)


Hyundai Venue मध्ये सनरूफ फीचर उपलब्ध आहे. सनरूफसह Hyundai Venue ची किंमत सुमारे 9.97 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.   


महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300)


Mahindra XUV300 ही एक एसयूव्ही कार आहे. या अपडेटेड कारमध्ये सनरूफ फीचर जोडण्यात आले आहे. सनरूफसोबत असलेल्या कारची किंमत सुमारे 9.9 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह येते.


फोर्ड इको-स्पोर्ट (Ford EcoSport)


फोर्ड इको-स्पोर्टमध्ये सनरूफचा पर्यायही उपलब्ध आहे. इको-स्पोर्टच्या टायटॅनियम व्हेरिएंटमध्ये हे फीचर देण्यात आले आहे. कारच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 8.20 लाख रुपये आहे, जी सुमारे 11.70 लाख रुपयांपर्यंत जाते. 


हे देखील वाचा- 



 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI