Electric Bike: नवीन वाहन उत्पादक कंपनी Ultraviolette Automotive ने बाजारात उतरताच कमाल केली आहे. Ultraviolette Automotive अलीकडेच आपली हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक Ultraviolette F77 लॉन्च केली आहे. या बाईकच्या   77 लिमिटेड युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने ही बाईक स्टँडर्ड आणि लिमिटेड एडिशन व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंग उघडल्याच्या अवघ्या 2 तासात कंपनीने लिमिटेड एडिशनच्या सर्व 77 युनिट्सची विक्री झाली आहे. अल्ट्राव्हायलेट F77 ची लिमिटेड एडिशन व्हर्जन स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळ्या डिझाइन आणि अधिक पॉवरसह येते. याची किंमतही स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे.


किती आहे किंमत?


अल्ट्राव्हायोलेट F77  स्टँडर्ड, रेकॉन आणि लिमिटेड एडिशन या तीन प्रकारांमध्ये आणले गेले आहे. तिन्ही प्रकारांच्या एक्स-शोरूम पुढील प्रमाणे आहे. F77 स्टँडर्ड ची किंमत 3.80 लाख रुपये आहे. तर F77 Recon 4.55 लाख रुपये आणि F77 लिमिटेड एडिशनची किंमत 5.50 लाख रुपये आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 च्या स्टँडर्ड प्रकारात 27 kW (36.2 bhp) इलेक्ट्रिक मोटर मिळते. तर Recon आणि Limited Edition प्रकारांना अनुक्रमे 29 kW (38.9 bhp) आणि 30.2 kW (40.5 bhp) इलेक्ट्रिक मोटर्स मिळतात. व्हेरियंटनुसार, ही बाईक अनुक्रमे 7.1 kWh, 10.3 kWh आणि 10.3 kWh बॅटरी पॅकने सुसज्ज आहे.


कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर F77 Standard 206 किमी, F77 Recon 307 किमी आणि F77 लिमिटेड एडिशन 307 किमीची रेंज देऊ शकते. तिन्ही बाईकमध्ये फिक्स्ड बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. ज्या बाईकमधून काढून चार्ज करता येणार नाहीत. तिन्ही बाईकचा टॉप स्पीड 147 किमी/तास आहे. Ultraviolette F77 Limited Edition चा पॉवर आउटपुट देखील खूप जबरदस्त आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 40.2 bhp पॉवर आणि 100 Nm टॉर्क जनरेट करते. 0 ते 60 किमी/ताशी वेग पकडण्यासाठी याला फक्त 2.8 सेकंद लागतात. बाईकमध्ये ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन राइड मोड आहेत. कंपनी F77 बॅटरीवर 8 वर्षे / 1 लाख किलोमीटरची वॉरंटी देत ​​आहे. या बाईकला नॉर्मल एसी चार्जरने पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7-8 तास लागतात. तर फास्ट चार्जरसह ही बाईक एका तासाच्या चार्जमध्ये 35 किमी पर्यंत धावू शकते. याला बूस्ट चार्जरचा पर्याय देखील मिळतो, ज्यामुळे बाईक फक्त 1.5 तासात 75 किमीच्या रेंजसाठी चार्ज करता येते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI