BSA Scrambler 650: वाहन उत्पादक महिंद्रा समूहाची भागीदार कंपनी आणि क्लासिक बाईक निर्माता BSA कंपनीच्या नवीन संकल्पनेतील बाईक सादर केली आहे. ही एक स्क्रॅम्बलर सेगमेंट बाईक आहे. जी गोल्ड स्टार 650 वर आधारित आहे. कंपनीने ही बाईक नव्या लूकमध्ये तयार केली आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्ड बाईकला टक्कर देईल. कंपनीने आपल्या या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
मिळणार दमदार इंजिन
BSA ची ही आगामी बाईक Scrambler कॉन्सेप्ट मॉडेल अंतर्गत 652cc प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आली आहे. हे एक कॉन्सेप्ट मॉडेल आहे. बाजारात याला कसा प्रतिसाद मिळू शकतो, हे जाणून घेतल्यानंतर त्याचे मुख्य मॉडेल लॉन्च केले जातील. नवीन बाईकमध्ये BSA गोल्ड स्टार प्रमाणेच चार-व्हॉल्व्ह DOHC, 652cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जे 6,000 rpm वर 45 bhp पॉवर आणि 4,000 rpm वर 55 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ट्विन स्पार्क प्लगने सुसज्ज असेल.
BSA मोटरसायकल आपली नवीन Scrambler बाईक आणण्यापूर्वी कंपनीची नवीन Gold Star 650 बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची टेस्ट सुरू झाली आहे. ही बाईक पुढील वर्षी मार्चपर्यंत जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली जाऊ शकते. ही बाईक तिच्या जुन्या लूकसारखीच असेल. यात गोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. या बाईकमध्ये वाइड सेट हँडलबार, राउंड हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि क्रोम बॉडी देण्यात येणार आहे. या नवीन बाईकची संभाव्य किंमत 4.9 लाख ते 9.8 लाख रुपये असू शकते.
भारतीय बाजारपेठेत Royal Enfield Interceptor 650 होणार स्पर्धा
BSA ची आगामी बाईक Royal Enfield Interceptor 650 शी स्पर्धा करेल. या बाईकमध्ये 648cc BS6 पॅरलल ट्विन एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 47.45 PS पॉवर आणि 52Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.97 लाख रुपयांपासून सुरू होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI