Sky Bus Service: भारतात स्काय बसबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले , देशात लवकरच स्काय बस (Sky Bus) यंत्रणा सुरू व्हावी, अशी माझी इच्छा आहे. नुकताच एक व्हिडिओ देखील समोर आला होता ज्यामध्ये ते स्काय बस प्रोजेक्टबद्दल माहिती घेताना दिसत होते.


स्काय बस सुरू झाल्यास सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. स्काय बस हा प्रकल्प प्रथम दिल्ली ते गुरुग्राम दरम्यान चालवला जाण्याची अपेक्षा आहे.स्काय बससेवा सुरू झाल्यास मेट्रोतील गर्दी आणि वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. भारतात स्काय बस सेवा कधी सुरू होणार? यापूर्वी अशा प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली होती का? स्काय बस कशी काम करते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.


स्काय बस म्हणजे काय?


स्काय बस ही मेट्रोसारखीच स्वस्त आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. यात एक उंच ट्रॅक असतो, ज्याला खालच्या बाजूने केबलद्वारे वाहनं किंवा कार लटकलेली असते. स्काय बस ही जर्मनीतील वुपरटल श्वाइझरबान किंवा एच-बान वाहतूक प्रणालीसारखीच आहे. स्काय बस अंदाजे 100 किमी/तास वेगाने प्रवास करू शकतात आणि विजेवर धावू शकतात.


स्काय बससाठी मेट्रोपेक्षा कमी खर्चिक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते आणि ती स्काय बस सेवा तुलनेने स्वस्त असते. स्काय बसचं हे उलटं कॉन्फिगरेशन गुरुत्वाकर्षणाचा अंदाज घेऊन बनवण्यात आलं आहे. यात वाहनाची चाकं ही वरती असलेल्या काँक्रीट बॉक्स ट्रॅकशी जोडली जातात, ज्यामुळे गाडी रुळावरून घसरण्याची किंवा उलटण्याची शक्यता नसते. स्काय बसमुळे वाहतुकीचा खर्च देखील कमी होतो.


भारतातील स्काय बस वाहतूक प्रणालीचा इतिहास


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये नवीन वर्षाची भेट म्हणून गोव्यासाठी स्काय बस प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, 100 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही.


पहिल्या टप्प्यांतर्गत, हा पायलट प्रोजेक्ट म्हापसा ते पणजीला जोडण्याचा ध्यास होता, ज्याचा प्रारंभिक मार्ग 10.5 किमी लांबीचा होता. पण 2016 मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने स्काय बस प्रकल्प रद्द केला, कारण तो त्यावेळी चांगलं आर्थिक सहाय्य देणारा ठरत नव्हता. त्यावेळी हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाकडे होता. आता नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.


हेही वाचा:


India: भारतातील 'या' अनोख्या गावात दोन देश; गावाचा प्रमुख जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये


Car loan Information:

Calculate Car Loan EMI