Rajiv Bajaj on EV: बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) स्टार्टअपची वाढती संख्या आणि काही ईव्हीमध्ये आग लागण्याच्या अलीकडच्या घटनांचा समाचार घेतला आहे. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बजाज ऑटोची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, ज्यांचा इलेक्ट्रिक वाहनांशी काहीही संबंध नाही ते लोक हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बजाज यांनी इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधले
राजीव बजाज म्हणाले, “नको ते वातावरण निर्माण केले जात आहे, याची मला सर्वात जास्त काळजी वाटते. कदाचित, सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांनी ईव्हीसाठीच्या नियमात जास्त सूट दिली आहे. हे काही प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलं असेल.'' ते म्हणाले, ''हा मुद्दा फक्त वाहनाला लागलेल्या आगीचा नाही. अशा घटना पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या वाहनांमध्येही घडल्या आहेत. समस्या उत्पादनाची मूलभूत प्रक्रिया आहे."
बजाज ऑटो नवीन प्लांटमध्ये 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
राजीव बजाज म्हणाले की, चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि त्याचे विक्रेता भागीदार या नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादन प्रकल्पामध्ये सुमारे 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. 6.5 एकर जमिनीवर पसरलेल्या वार्षिक पाच लाख युनिट्स क्षमतेच्या दुचाकी उत्पादन प्रकल्पाचे उद्दिष्ट देशांतर्गत आणि निर्यात बाजाराच्या दोन्ही गरजा पूर्ण करणे आहे.''
बजाज चेतक ई-स्कूटरची बुकिंग वाढली
बजाजने त्याची इलेक्ट्रिक चेतक स्कूटर ऑक्टोबर 2019 मध्ये लॉन्च केली होती. कंपनीने सांगितले की, या लॉन्च झाल्यापासून त्यांनी 14,000 चेतक ई-स्कूटर्सची विक्री केली आहे आणि 16,000 हून अधिक बुकिंग मिळवले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Mahindra Neo Plus लवकरच दिसणार नव्या लूकमध्ये; 'हे' मिळतील दमदार फीचर्स
- Volvo XC40 : Volvo आपली पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 जुलैमध्ये करणार लॉन्च! जाणून घ्या फिचर्स
- Volkswagen Virtus Sedan भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Car loan Information:
Calculate Car Loan EMI