Top Selling Scooters: भारतात सर्वाधिक विक्री बाईकची होते. मात्र दुचाकींच्या बाजारपेठेत स्कूटरच्या विक्रीचा स्वतःचा दबदबा आहे. जर आपण स्कूटरच्या विक्रीवर नजर टाकली तर, यावर्षी जुलैमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरची संख्या सुमारे 4.29 लाख युनिट्स होती. जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 27.53 टक्के अधिक आहे. यातच अशी एक स्कूटर आहे, ज्याची विक्री देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्या बाईकपेक्षा जास्त आहे. देशातील दुचाकी श्रेणीतील विक्रीत ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत केवळ हिरो स्प्लेंडर बाईकच यापुढे टिकू शकली आहे. होय! आम्ही Honda ची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर Activa बद्दल बोलत आहोत, तर चला जाणून घेऊया याच्या विक्रीचे आकडे काय आहेत.
देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरमध्ये होंडा अॅक्टिव्हा (Activa) पहिल्या क्रमांकावर आहे. जुलै 2022 मध्ये, Honda ने या स्कूटरच्या एकूण 2,31,807 युनिट्सची विक्री केली आहे. अशा प्रकारे दररोज सरासरी 7,726 युनिट्सची विक्री झाली आहे. तर जुलै 2021 मध्ये या स्कूटरच्या एकूण 1,62,956 युनिट्सची विक्री झाली, जी या वर्षाच्या तुलनेत 31.21 टक्के कमी आहे. Hero Splendor बाईक वगळता Honda Activa ची विक्री सर्वाधिक आहे.
किंमत किती?
होंडा या स्कूटरच्या तीन व्हर्जन बाजारात सादर करते, ज्यात Honda Activa, Honda Activa 125 आणि Honda Activa Premium Edition यांचा समावेश आहे. ज्यामध्ये सर्वात स्वस्त मॉडेल Honda Activa ची दिल्ली एक्स-शोरूममध्ये किंमत 72400 रुपये आहे.
या स्कूटर्सचीही मोठ्या प्रमाणावर झाली विक्री
इतर स्कूटर्सच्या विक्रीवर नजर टाकली तर सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्कूटरच्या बाबतीत TVS ज्युपिटर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै 2022 मध्ये ज्युपिटरने 62,094 युनिट्स विकल्या. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या Suzuki Access ने जुलै 2022 मध्ये 41,440 युनिट्स विकल्या. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 78,300 ते 86,200 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tata Tiago XT Rhythm : नवीन फिचर्ससह Tata Tigor चा XT Rhythm व्हेरिएंट भारतात लॉन्च; किंमत फक्त 6.45 लाख रुपये
- Innova Crysta Diesel : टोयोटाने भारतात बंद केले इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Car loan Information:
Calculate Car Loan EMI