Best Mileage CNG Cars: गेल्या काही महिन्यांत सीएनजीच्या (CNG) किंमती खूप वाढल्या आहेत, त्यानंतर आता पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये फारच कमी फरक आहे. तरीही सीएनजीचे दर पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहेत. पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कार अधिक किफायतशीर मायलेज देतात. तसेच हे इंधन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चांगला पर्याय आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही चांगल्या सीएनजी कारच्या शोधात असाल, तर भारतीय बाजारपेठेत उपलब्ध अशा 5 उत्कृष्ट सीएनजी कारबद्दल जाणून घ्या, ज्या केवळ चांगले मायलेजच देत नाहीत तर त्यांच्या किंमतीही खूप कमी आहेत. कोणत्या आहेत त्या 5 CNG गाड्या?


मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी (Maruti Suzuki S-Presso CNG)


मारुतीची ही कार देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये गणली जाते. या कारमध्ये, कंपनीने 1.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 59 पीएस पॉवर आणि 78 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 31.2 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.38 लाख रुपये आहे.


मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी (Maruti Suzuki Celerio CNG)


या कारमध्ये 998 सीसी इंजिन वापरण्यात आले आहे, जे 57hp पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर या कारचे मायलेज 35.6 किमी/किलो आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.69 लाख रुपये आहे. 


ह्युंदाई सँट्रो सीएनजी (Hyundai Santro CNG) 


या Hyundai कारला 1.1L पेट्रोल इंजिन मिळते, जे 60 PS पॉवर आणि 85 Nm कमाल टॉर्क निर्माण करू शकते. ही कार 1 किलो CNG वर 30.48 किमी पर्यंत धावू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.10 लाख रुपये आहे. 


मारुती अल्टो सीएनजी (Maruti Alto CNG)


मारुतीने या कारमध्ये 796cc इंजिन वापरले आहे, जे 35.3 kW पॉवर आणि 69 Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही कार CNG वर ३१.५९ किमी/किलो मायलेज देऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.03 लाख रुपये आहे.  


मारुती वॅगन आर सीएनजी (Maruti Wagon R CNG)


देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार तिच्या CNG आवृत्तीमध्ये 32.52 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 58 hp पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.42 लाख रुपये आहे.


Tata Tigor चा सीएनजी व्हेरिएंट, मिळणार जबरदस्त मायलेज


Tata Motors ने Tigor चा CNG व्हेरिएंट लॉन्च केला आहे. टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला वाहनांची ICNG रेंज सादर केली होती. ज्याला भारतीय बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. iCNG रेंजच्या यशामुळे कंपनी आता Tigor चा XM व्हेरिएंट iCNG पर्याय घेऊन आली आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या Tata Tigor XM ICNG ची किंमत 7,39,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टाटा मोटर्स डेटोना ग्रे,अॅरिझोना ब्लू, डीप रेड आणि ओपल व्हाईट रंग पर्यायांमध्ये टिगोर XM iCNG ऑगस्टच्या सुरवातीच्या आठवड्यात लॉन्च केली. Tigor XM iCNG मध्ये 4 स्पीकर सिस्टमसह हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, रियर पार्किंग सेन्सर्स, पॉवर विंडो आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. कारचे पॉवरिंग 3-सिलेंडर 1.3-लिटर BS6 इंजिन आहे. जे पेट्रोल मोडवर 84.8 Bhp आणि 113 Nm टॉर्क आणि CNG मोडवर 73.2 Bhp आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये Tata Tigor 19.27 kmpl मलेज देते आणि CNG मोडमध्ये 26.49 km/kg मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे


महत्वाच्या बातम्या : 



 


 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI