Best Mileage Bike: वाढत जाणाऱ्या इंधन दरामुळे अनेकजण अधिक मायलेज देणारी कार, बाईक खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. तुम्हीदेखील अधिक मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही बाईकचा पर्याय आहे. या  बाईकचा विचार तुम्ही करू शकता. जाणून घेऊयात या बाईकची वैशिष्ट्ये 


Bajaj CT 100X ही चांगली मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची किंमत 59104  रुपयांपासून सुरू होते. या बाईकला बीएस 6 इंजिन असून 115 सीसी क्षमता आहे. यामध्ये डेटाइम रनिंग लाइट फीचर आहे. बाइकचे इंजिन 7000RPM वर 8.6 पीएस पॉवर आणि 5000 आरपीएमवर 9.81 न्यूटन मीटर इतके पीक टॉप्क जनरेट करते. ही बाइक एका लिटरमध्ये 75 किमी अंतर कापू शकते. 


Bajaj Platina 100  या बाईकची किंमत 52,915 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक 4 व्हेरिएंट आणि 10 रंगात उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 102 सीसीचे इंजिन आहे. हे इंजिन 7.79 बीएचपी पॉवर आणि 8.3 न्यूटन मीटरचे टॉर्त जनरेट करते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 72 किमी अंतर कापते. या बाईकमध्ये 11 लिटर पेट्रोलची टाकी आहे. या बाईकचे वजन 119 किलो आहे. 


TVS Sport ही देखील एक मायलेज बाइक आहे. या बाईकची किंमत 60 हजार 130 रुपयांपासून सुरू होते. ही बाइक दोन व्हेरिएंट आणि सात रंगामध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 109 सीसी क्षमतेचे इंजिन आहे. यामुळे 8.18 बीएचपी पॉवर आणि 8.7 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 70 किमीपर्यंतचा मायलेज देते. यामध्ये 10 लिटर पेट्रोलची टाकी आहे. 


Bajaj CT 110 बाईकची किंमत 58,925 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक दोन व्हेरिएंट आणि सात रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 115.45 सीसीचे इंजिन आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किमीचे अंतर कापते. याचे इंजिन 8.48 बीएचपी पॉवर आणि 9.81 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करतात.  


Car loan Information:

Calculate Car Loan EMI