Bajaj Pulsar N160 : बजाज ऑटोने त्यांच्या लोकप्रिय पल्सर रेंजमध्ये नवीन पल्सर एन160  (Pulsar N160) हे मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने बजाज पल्सर N160 ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 1,25,824 रुपये निश्चित केली आहे. बाईकची ही किंमत कोलकात्यात एक्स-शोरूम आहे. पल्सर एन250 आणि पल्सर एफ250 नंतर पल्सर लाइनअपमधील हे तिसरे मॉडेल आहे. पल्सर N160 ची आणि N250 रचना सारखीच आहे. परंतु, नवीन मॉडेलमध्ये इंजिनचा अकार लहान आहे.  


इंजिन आणि पॉवर कशी आहे?
पल्सर एन160 मध्ये 164.8cc, ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 16 पीएस पॉवर आणि 14.65 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड गिअरबॉक्स युनिट देण्यात आले आहेत. पूर्वी विकल्या गेलेल्या Pulsar NS160 च्या 160cc, 4 व्हॉल्व्ह इंजिनच्या तुलनेत Pulsar N160 चे पॉवर आउटपुट 1.2hp ने कमी झाले आहे. त्यामुळे टॉर्क आउटपुट समान आहे.


नवीन फिचर्स काय आहेत?
बजाज पल्सल N160 मध्ये सिंगल चॅनल आणि डबल चॅनल ABS चा पर्याय आहे. त्याचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पल्सर N250 सारखाच आहे. ज्याच्या समोर एक लहान विंडस्क्रीन आहे. N250 प्रमाणे  Pulsar N160 ला ट्विन व्हर्टिकल LED टेल लॅम्प, स्प्लिट ग्रॅब रेल आणि Y-आकाराचे अलॉय व्हील देखील मिळतात. त्यामुळे 160cc मॉडेलला एक्झॉस्ट देखील मिळतो, एक्झॉस्टमुळे इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक आकर्षक दिसते. हे USB चार्जिंग पोर्ट, 14-लिटर इंधन टाकी आणि Digi-Analog इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह सुसज्ज आहे. 


जबरस्त सस्पेन्शन
पल्सरच्या नवीन मॉडेलमध्ये सस्पेंशनसाठी समोर 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनो-शॉक वापरण्यात आले आहेत. बाइकला 17-इंच चाके 100/80-17 फ्रंट टायर आणि 130/70-17 मागील टायर आहेत. ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनल ABS मॉडेलवर 230mm मागील डिस्कसह मागील बाजूस 300mm फ्रंट डिस्क आहे. एक सिंगल-चॅनल ABS  देखील आहे जी लहान 280 मिमी फ्रंट डिस्क ब्रेकसह येते. परंतु, त्याच 230 मिमी मागील डिस्कसह येते. सिंगल-चॅनल मॉडेलचे वजन 152 किलोग्रॅम आहे, तर ड्युअल-चॅनेल ABS मॉडेलवचे वजन 154 किलो आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI