Maybach S-Class: जर्मन बनावटीच्या आलिशान कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेन्झने आपली नवीन Maybach S-Class भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने भारतात याची एक्स-शोरूम किंमत 2.5 कोटी इतकी ठेवली आहे. कंपनीने या कारचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. याचा दुसरा व्हेरिएंट आलेल्या Maybach S-Class 680 4Matic ची किंमत 3.2 कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. ही कार दिसायला इतकी देखणी आहे की, पाहताच क्षणी पहिल्या नजरेतच ही तुम्हाला पसंद पडेल. कंपनीची ही कार अत्यंत लक्झरिअस आहे. या बातमीद्वारे आपण या कारच्या स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
लक्झरी आणि तंत्रज्ञानाचे एक वेगळं मिश्रण
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन श्वेंक यांनी या कारची माहिती देताना सांगितलं आहे की, “नवीन मर्सिडीज मेबॅक एस-क्लास ही लक्झरी आणि तंत्रज्ञानाचे एक वेगळं मिश्रण आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही कार ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त सक्षम असेल.” भारतात लॉन्च केलेली कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात चांगली कार असल्याचे देखील ते म्हणाले आहे.
कारमध्ये मिळणार आठ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन
कंपनीने आपल्या या नवीन कारमध्ये आठ सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. यात इंटिग्रेटेड सेकंड जनरेशन स्टार्टर-अल्टरनेटर (ISG) आणि 48-व्होल्ट ऑनबोर्ड इलेक्ट्रिकल सिस्टम देखील देण्यात आले आहे. तसेच S 580 4MATIC इंजिन 370 kW (503 hp) पॉवर जनरेट करते. जे 4.8 सेकंदात शून्य ते 100 किमी/ताशी वेगाची गती प्राप्त करू शकते.
हे देखील वाचा-
- काय आहे ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम? याची सुरुवात कशी झाली...
- Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती
- New Everest/Endeavour: फोर्ड इंपोर्टेड नवीन एव्हरेस्ट-एन्डेव्हर येतेय, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
- Cheapest SUV In India : मोठ्या कुटुंबासाठी भारदस्त कार, देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर SUV
- E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI