Tata Punch Facelift: टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वीच नवी पंच ईव्ही (Auto News) लाँच केली आहे. या नव्या मॉडेलमध्ये नव्या फिचर्ससोबतच डिझाइन आणि इंटिरिअरमध्ये ही अनेक बदल (Tata Punch Facelift) करण्यात आले आहेत. पंचच्या आयसीई व्हर्जनमध्येही असेच बदल केले जाऊ शकतात. पंच ईव्हीच्या लाँचिंगच्या निमित्ताने टाटा मोटर्सने सांगितलंय केली आहे की पंच फेसलिफ्ट येत्या 14-15 महिन्यांत देशात लाँच होईल, म्हणजेच 2025 च्या सुरुवातीला ती बाजारात येऊ शकते.
डिझाइन अपडेट
अपडेटेड नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीप्रमाणेच नवीन टाटा पंच फेसलिफ्टमध्येही मोठे डिझाइन अपडेट मिळण्याची शक्यता आहे. नव्या मॉडेलमध्ये नेक्सॉन फेसलिफ्टसारखे स्टायलिंग एलिमेंट्स मिळण्याची शक्यता आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल मिळेल, जी नवीन टाटा एसयूव्हीसारखी असेल. सब-4 एम एसयूव्हीमध्ये व्हर्टिकल स्टॅक एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. मागील बाजूस एसयूव्हीला नवीन एलईडी टेल-लाइट्ससह अद्ययावत टेलगेट मिळू शकते. कंपनीचे म्हणणे आहे की अपडेटेड पंच नवीन पंच ईव्हीपेक्षा वेगळा दिसेल.
फिचर्स कसे असतील?
केबिनमध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट आणि नवीन इंस्ट्रूमेंट कंसोलसह डॅशबोर्ड लेआउटच्या स्वरूपात बदल होण्याची अपेक्षा आहे. यात फुल-टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटोसह 10.25 इंचाचे मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट आणि एअर कंडिशनिंगसाठी नवीन टच-पॅनेल अॅपल कारप्ले मिळण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि रियर डिस्क ब्रेक मिळणार नाहीत, जे इलेक्ट्रिक पंचमध्ये मिळतात.
5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स
नवीन टाटा पंच फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेले 1.2 लीटर 3-सिलिंडर एनए पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 86 पीएस पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गियरबॉक्सचा पर्याय आहे. टाटाच्या ट्विन-टँक सिस्टम सीएनजी व्हर्जनसोबत ही ऑफर केली जाऊ शकते. टॉप-स्पेक मॉडेलमध्ये अल्ट्रोज आय-टर्बोला पॉवर देणारे 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळू शकते.
TATA Punch EV 5 जानेवारीला लॉंच
सध्या सगळीकडेच EV कारची क्रेझ (Auto News) आहे. अनेकांना EV कार खरेदी करायची असते. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून अनेकांनी EV कारला पसंती दिली आहे. त्यातच आता टाटा मोटर्सने सगळ्यांना एक चांगलं ऑप्शन उपलब्ध करुन दिलं आहे. टाटा मोटर्सने दिनांक 5 जानेवारीला शुक्रवारी त्यांची टाटा पंच EV समोर आणली. ही कार पूर्ण चार्जिंग केल्यावर 300 ते 400 किलोमीटर पर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. टाटा मोटार्सने आणलेल्या या पंच EV गाडीची बुकिंगही सुरू झालेली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Car loan Information:
Calculate Car Loan EMI