Tata Curvv Diesel : टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट बेस्ड कूप एसयूव्ही ही (Tata Curvv Diesel ) या वर्षी लाँच होणाऱ्या नव्या कारपैकी एक आहे. टाटा मोटर्सने अधिकृतरित्या माहिती दिली आहे की हे मॉडेल सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केले जाईल आणि त्यानंतर त्याचे आयसीई व्हर्जन लाँच केले जाईल. कर्व्ह ईव्हीचे प्रॉडक्शन एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते आणि 2024 च्या शेवटपर्यंत बाजारात लाँच केले जाईल. या इलेक्ट्रिक कूप एसयूव्हीची निर्मिती पुण्याजवळील रांजणगाव येथील टाटाच्या कारखान्यात केली जाईल.
टाटा कर्व्ह डिझेल
टाटा मोटर्सने कर्व्ह एसयूव्हीसाठी सुमारे 48,000 युनिट्स विकण्याची तयारी आहे, ज्यात त्याच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटच्या 12,000 युनिट्सचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, कूप एसयूव्हीमध्ये नेक्सनचे 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जे 115 बीएचपी पॉवर आणि 260 एनएमचे आउटपुट जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळेल.
टाटा कर्व्ह पेट्रोल
कर्व्ह टाटाचे नवीन 1.2 एल, 3-सिलिंडर इंजिन लाँच करणार आहे. जे गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. हे इंजिन 5000आरपीएमवर 125 पीएस पॉवर आणि 1700आरपीएम ते 3500आरपीएमवर 225एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पेट्रोल आणि ई 20 इथेनॉल पेट्रोल मिक्स इंधनावर चालू शकते. नवीन पेट्रोल इंजिन पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून बनविलेले आहे. यात मॅन्युअल युनिट आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
टाटा कर्व्ह ईव्ही रेंज
कर्व्ह ईव्हीला 500 किमीपेक्षा जास्त रेंज मिळू शकते. इलेक्ट्रिक कूप एसयूव्ही टाटाच्या नवीन अॅक्टी.ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जी नुकतीच पंच ईव्हीसह सादर करण्यात आली होती. हे आर्किटेक्चर अनेक बॉडी स्टाईल आणि पॉवरट्रेनला सपोर्ट करते. यात मोठी बॅटरी पॅक, ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि ड्युअल मोटर सेटअप मिळण्याची शक्यता आहे.
TATA Punch EV 5 जानेवारीला लॉंच
सध्या सगळीकडेच EV कारची क्रेझ (Auto News) आहे. अनेकांना EV कार खरेदी करायची असते. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून अनेकांनी EV कारला पसंती दिली आहे. त्यातच आता टाटा मोटर्सने सगळ्यांना एक चांगलं ऑप्शन उपलब्ध करुन दिलं आहे. टाटा मोटर्सने दिनांक 5 जानेवारीला शुक्रवारी त्यांची टाटा पंच EV समोर आणली. ही कार पूर्ण चार्जिंग केल्यावर 300 ते 400 किलोमीटर पर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. टाटा मोटार्सने आणलेल्या या पंच EV गाडीची बुकिंगही सुरू झालेली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Car loan Information:
Calculate Car Loan EMI