Safe Driving Tips :  सध्या सगळीकडेच आपण कारने प्रवास करतो. अनेक लोक (Safe Driving Tips) लांबचा प्रवासदेखील करतात. सध्याच्या कारला नवनवे  सेफ्टी फिचर्स दिले जात आहे. प्रवाशांनी सुखाचा प्रवास करावा यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडूनही नवनवे यंत्र रस्त्यांवर बसवण्यात येत आहे. मात्र कार चालवताना अनेक लोक बारीक चूक करतात आणि त्यांचा थेट चालान कापला जातो. चालान कापल्याचा मेसेज आल्यावर आपल्याला आपली चूक कळते. या चालान कापण्यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर कार चालवताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.


वाहतुकीचे नियम पाळा


ट्रॅफिक चालान टाळण्याचा सर्वात सोपा आणि सोपा मार्ग म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणे. ज्याचे पालन करावे लागेल. दुसरा कोणताही उपाय नाही. मात्र, वाहतुकीचे नियम पाळल्याने तुम्हाला चालानपासून वाचवले जातेच, शिवाय तुमची सुरक्षितताही वाढते. 


वाहन चालवण्याची घाई करू नका


ड्रायव्हिंगची घाई केली ही चालान कापलंच म्हणून समजा. कारण आता हायटेक कॅमेऱ्यांचा जमाना आहे. त्यामुळे एक-दोन कॅमेऱ्यांची नजर टाळता येईल, पण आता प्रत्येक रस्त्यांवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेगमर्यादेतच गाडी चालवावी. 


फोन वापरू नका 


वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे हे आजकाल चालान आणि अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. हे टाळले पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मोबाईल वापरायचा असेल तेव्हा गाडी बाजूला करावी. फोनवर बोलताना गा़डी चालवल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सोबतच्या प्रवाशांचा जीवही धोक्यात येतो. त्यामुळे फोनवर बोलत किंवा फोन चाळत गाडी चालवू नका. 
 


दारू पिऊन गाडी चालवू नका


ड्रिंक अॅंड ड्राइवचं चालान म्हणजे खिसाच रिकामा होतो. खरंतर दारु पिऊन गाडी चालवल्याने आपल्यासोबतच दुसऱ्याचाही जीव धोक्यात येतो. यामुळे अपघात घडण्याची शक्यता जास्त असते. आतापर्यंत आपण अनेक अपघात ड्रिंक अॅंड ड्राइवमुळे झाल्याचं पाहिलं आहे त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ड्रिंक अॅंड ड्राइवचं चालान कापलं तर थेट  चालानची रक्कम  पहिल्यांदा 10,000 रुपये आणि दुसर् यांदा त्याच चुकीसाठी 15,000 रुपये आहे, तसेच इतर तरतुदीही आहेत. त्यामुळे जर वाहतुकीचे नियम पाळले  तर आपल्यावर दंड होणार नाही आणि अपघातदेखील होणार नाही. 


इतर महत्वाची बातमी-


Electric Bikes Under 4 lakhs : एक ते चार लाख रेंजमध्ये या 10 भन्नाट इलेक्ट्रिक बाईक्स कोणत्या?


 

 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI