Mahindra XUV300 Electric : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) भारतात आपला इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ वाढविण्याच्या तयारीत आहे. आता या प्रवासात नवीन इलेक्ट्रिक SUV Mahindra eXUV300 कारची देखील भर पडू शकते. Mahindra eXUV300 कार लॉन्च करण्याच्या शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी, महिंद्रा केवळ आपल्या बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित XUV E8 लाँच करणार नाही, तर याबरोबरच ही कार आपल्या लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV XUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल तसेच त्याचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील लॉन्च करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, कंपनीने अद्याप या संदर्भात कोणतीही विशेष माहिती दिलेली नाही.
आगामी Mahindra EXUV300 बद्दल सांगायचे झाल्यास, ही कार सर्वात आधी ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आली होती. गेल्या 4 वर्षात ईव्ही मार्केटमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यानंतर महिंद्रा कंपनीकडून XUV400 हे नवीन मॉडेल देखील सादर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, जर XUV300 इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करण्यात येणार असेल तर या कारची थेट स्पर्धा ईव्ही सेगमेंटची लीडिंग थेट टाटा नेक्सॉनबरोबर होणार आहे. आणि त्याची किंमत 12-15 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
महिंद्रा XUV300 इलेक्ट्रिक बद्दल सांगायचे झाल्यास, त्याच्या IC इंजिन मॉडेलच्या तुलनेत त्याच्या पुढील आणि मागील लूकमध्ये काही बदल दिसू शकतात. यामध्ये नवीन हेडलॅम्प आणि फ्रंट क्लोज्ड ग्रिल, पॉवरफुल बंपर, अधिक चांगले फॉग लॅम्प पोझिशनिंग, नवीन अलॉय व्हील, आकर्षक टेल लॅम्प आणि मागील डिझाईन यासोबतच बाहेरील भागात अनेक खास गोष्टी असतील. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, हे पेट्रोल-डिझेल व्हेरिएंटपेक्षा वेगळे आणि अॅडव्हान्स असू शकते आणि 360 डिग्री कॅमेरासह अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळू शकतात.
दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर होणार
EXUV300 दोन प्रकारच्या व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाऊ शकते, जी वेगवेगळ्या बॅटरी पॉवरट्रेनमध्ये असेल. त्याच्या बेस मॉडेलची बॅटरी रेंज सिंगल चार्जवर 300 किलोमीटरपर्यंत असू शकते आणि टॉप व्हेरियंटची सिंगल चार्ज बॅटरी रेंज 450 किलोमीटरपर्यंत असू शकते. तसेच, वेग आणि शक्तीच्या बाबतीत, ते टाटा नेक्सॉन ईव्ही तसेच अलीकडेच लाँच झालेल्या टाटा पंच ईव्हीला टक्कर देऊ शकते. महिंद्रा अँड महिंद्रा येत्या काळात याबाबत अधिकृत घोषणा करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
Hyundai EV Charging Station : Hyundai ने देशभरात 11 नवीन DC फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारले; सर्व EV ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध
Car loan Information:
Calculate Car Loan EMI