Kia EV9 electric SUV Launch : किआ ईव्ही 9 ची टेस्टिंग भारतात (Kia) सुरु झाली आहे, यावर्षी ती भारतीय बाजारात आणली जाऊ शकते. लाँचिंगची  तारीख अजून जाहीर करण्यात आली नसली तरी 2023 च्या शेवट लाँच होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) आर्किटेक्चरवर तयार करण्यात आलेल्या आणि कियाच्या अपडेटेड बॅटरी टेक्नॉलॉजीचा समावेश असलेली ईव्ही 9 ही कियाची लेटेस्ट इलेक्ट्रिक कार मानली जाते.
 
जागतिक स्तरावर, ईव्ही 9 तीन पॉवरट्रेन पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यात 76.1 किलोवॅट बॅटरीसह सिंगल मोटर रियर व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) एंट्री-लेव्हल व्हेरिएंट, 99.8 किलोवॅट बॅटरी व्हेरिएंट आणि 379 बीएचपीपॉवर आउटपुट आणि 450 किमी रेंजसह ड्युअल-मोटर आरडब्ल्यूडी व्हेरिएंटचा समावेश आहे. बेस व्हेरियंट लहान बॅटरीसह 358 किमी आणि मोठ्या बॅटरीसह 541 किमी रेंज देण्याची शक्यता आहे.


चार्जिंग सेटअप


या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये फिक्स्ड आणि पोर्टेबल चार्जिंगचे दोन्ही पर्याय आहेत, ज्यामध्ये फास्ट चार्जरचा वापर करून अवघ्या 24 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते. हा सेटअप 15 मिनिटांच्या चार्जसह 248 किलोमीटरची रेंज देते. किआ ईव्ही 9 आपल्या इंटिग्रेटेड चार्जिंग कंट्रोल युनिटद्वारे व्हेइकल-टू-लोड (व्ही 2 एल) मिळणार आहे.


फिचर्स कसे असतील?


ईव्ही 9 मध्ये लेव्हल 3 अॅडव्हान्सड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (एडीएएस), नेव्हिगेशन आणि वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3 इंच ड्रायव्हर डिस्प्ले स्क्रीन, 5.3 इंच क्लायमेट कंट्रोल स्क्रीन, 14 स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, ओव्हर-द-एअर (ओटीए) अपडेट्स, वायरलेस फोन चार्जिंग, एम्बियंट लाइटिंग, सी-टाइप यूएसबी पोर्ट आणि फिंगरप्रिंट सेन्सर सह अनेक अॅडव्हान्स फिचर या कारमध्ये बघायला मिळणार आहे. 


किआ ईव्ही 9 मध्ये हॉट आणि हवेशीर फ्रंट आणि सेकंड रांगेतील सीट, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग पॅडल शिफ्टर्स, हॉट स्टीअरिंग व्हील, सर्व प्रवाशांसाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट, उंची-समायोज्य स्मार्ट सीट, पॉवर टेलगेट आणि ऑटोमॅटिक डिफॉगर देण्यात आले आहेत. किआ ईव्ही 9 मध्ये हेडरेस्ट आणि स्विव्हल फंक्शनसह 60:40 स्प्लिट रिमोट फोल्डिंग सेकंड रो सीट आणि हेडरेस्टसह 50:50 स्प्लिट रिमोट फोल्डिंग थर्ड रो सीटसह फ्लेक्सिबल सीटिंग लेआउट देण्यात आले आहे.


इतर महत्वाची बातमी-


 New Kia Sonet Facelift : हायटेक सेफ्टी फीचर्स, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टम; सात लाखात लाँच झाली Kia Sonet Facelift!


Jio AirFiber :Jio AirFiberने लाँच केले 3 डेटा बूस्टर प्लॅन, युजर्संना मिळणार 1000 GB हायस्पीड इंटरनेट डेटा


Car loan Information:

Calculate Car Loan EMI