Hyundai Creta EV and Honda Elevate EV : भारतातील सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV, ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta), आणि होंडा एलिव्हेट (Honda Elevate), काही महिन्यांपूर्वीच लॉन्च करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही वर्षांत या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जनही (EV) बाजारात एन्ट्री करणार आहे. Creta EV ची सध्या टेस्टिंग सुरु आहे. ही कार पुढील वर्षी 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. तर, Elevate EV पुढील 2-3 वर्षांत बाजारात येण्याची अपेक्षा आहे. या आगामी इलेक्ट्रिक SUV बद्दल अधिक महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. 


ह्युंदाई क्रेटा ईव्ही (Hyundai Creta EV)


Hyundai Creta EV ही कार नुकत्याच लाँच केलेल्या फेसलिफ्टेड ICE मॉडेलवर आधारित असेल. ज्यामध्ये समान डिझाईन घटक असतील. तसेच, त्यात काही EV विशिष्ट तपशील आणि वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. या कारचं पॉवरट्रेन नेमकं कसं असेल या संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार LF Chem कडून मिळालेला 45kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर ग्लोबल-स्पेक Kona EV वरून घेतली गेली आहे, जी समोरच्या एक्सलवर आधारित असेल, 138bhp पॉवर आउटपुट आणि 255Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. ही कार आगामी मारुती सुझुकी eVX शी स्पर्धा करणार असं सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध असतील. ज्यामध्ये 48kWh आणि 60kWh बॅटरी पॅक उपलब्ध असेल. काही EV-विशिष्ट अपडेट असूनही, Creta EV चे आतील लेआउट आणि वैशिष्ट्ये त्याच्या ICE-मॉडेल प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे.


होंडा एलिव्हेट ईव्ही (Honda Elevate EV) 


Honda Elevate EV ब्रँडच्या 'ACE' (एशियन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक) प्रकल्पाचा एक भाग असणार आहे. ही कार 2026 पर्यंत भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. या उपक्रमांतर्गत उत्पादित होणारी वाहने 50 ते 70 टक्के स्थानिक पातळीवर उत्पादित केली जातील आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्याचे नियोजन आहे. DG9D कोडनाम असलेल्या, Elevate EV ने त्याच्या ICE मॉडेलप्रमाणेच डिझाईन घटक, घटक आणि वैशिष्ट्ये शेअर करणे अपेक्षित आहे. होंडाचा राजस्थानमधील टपुकारा प्लांट या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन केंद्र म्हणून काम करेल.


महत्त्वाच्या बातम्या : 


Skoda Slavia Style Edition : Skoda ची लिमिटेड एडिशन Slavia कार भारतात लॉन्च; विविध कलर ऑप्शनसह फक्त 500 युनिट्स उपलब्ध


Car loan Information:

Calculate Car Loan EMI