PMV EaS-E : Tata Motors ने अलीकडेच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लाँच केली. त्याची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, बुधवारी कमी किंमतीतील आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिक (PMV Electric) या स्वस्त इलेक्ट्रिक कारने मार्केटमध्ये दमदार एंट्री केली आहे. कंपनी 16 नोव्हेंबर रोजी मायक्रो-इलेक्ट्रिक कार EaS-E (EAS-E) लाँच करण्यात आली.


सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार


Personal Mobility Vehicle (PMV) नावाच्या कंपनीने पूर्णपणे नवीन सेगमेंट मायक्रो इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार आकाराने खूपच कॉम्पॅक्ट असेल. रिपोर्टनुसार, त्याची किंमत 4.79 लाख रुपये आहे. त्याला 4 दरवाजे दिले जातील, समोर फक्त एक सीट आणि मागील बाजूस एक सीट असेल.


कारचे फीचर्स असे आहेत
या मायक्रो इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला क्रूझ कंट्रोल, रिमोट पार्किंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, IP67 रेटिंगसह लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या कारमध्ये हाय स्ट्रेंथ शीट मेटल, एअरबॅग्ज आणि सीट बेल्टही उपलब्ध आहेत. याशिवाय कारमध्ये 11 रंगांचा पर्यायही आहे.आकाराच्या बाबतीत, कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी, उंची 1,600 मिमी आणि 2,087 मिमी चा व्हीलबेस आहे. कारची रचना 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह सुरळीत चालण्यासाठी केली गेली आहे.


कारची रेंज


ही कार आता देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. एका चार्जवर 70 किमी प्रतितास वेगाने या कारची रेंज 200 किमी आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ही कार तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही कंट्रोल करू शकता. या इलेक्ट्रिक कारमध्ये PMSM इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 10 kW ची कमाल पॉवर आणि 500 ​​Nm चे पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात.


टाटा टियागो इलेक्ट्रिक कार


टाटाची ही कार आता देशातील दुसरी सर्वात स्वस्त कार बनली आहे. त्‍याच्‍या टॉप व्हेरियंटची सुरुवातीची किंमत रु. 8.49 लाख ते रु. 11.79 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या कारमध्ये तुम्हाला दोन बॅटरी पॅक मिळतात, पहिला 19.2kWh क्षमतेचा जो 61 PS पॉवर आणि 110 NM पीक-टॉर्कसह 250 किमीची रेंज देतो. आणि दुसरा 24kWh क्षमतेसह, जो 75 पीएस पॉवर आणि 114 NM च्या पीक-टॉर्कसह 315 किमीची श्रेणी देतो.


महत्वाच्या बातम्या : 


E-Motorad ने लॉन्च केली नवीन फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI