EMotorad Doodle V2 foldable e-bike launched: देशात आता इलेक्ट्रिक चारचाकी, बाईक, स्कूटरसह आता सायकलही लॉन्च होताना दिसत आहे. या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक सायकललाही चांगलीच मागणी आहे. अशातच इलेक्ट्रिक सायकल निर्माता E-Motorad ने अलीकडेच आपली नवीन फोल्डेबल ई-सायकल डूडल V2 भारतात लॉन्च केली आहे. ही एक फॅट टायर सायकल आहे. जी 49,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक सायकल कंपनीच्या वेबसाइटवरून तसेच Amazon, Flipkart, Croma आणि ऑफलाइन डीलरशिपवरून खरेदी केली जाऊ शकते.


कंपनीने आपल्या जुन्या इलेक्ट्रिक सायकलला अपडेट करून ही डूडल V2 फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल बाजारात उतरवली आहे. या ई-सायकलमध्ये हाय पॉवर लिथियम आयन बॅटरी, मल्टी फंक्शन एलसीडी डिस्प्ले एअर, फ्रंट लाइट, रिअर लाइट, इंटिग्रेटेड हॉर्न आणि एलसीडी कव्हर देण्यात आले आहे. ब्रेकिंग सुधारण्यासाठी, याच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. जे ऑटो कटऑफ फंक्शनसह येतात. यामध्ये शिमॅनोला सेव्हेन-स्पीड गिअर शिफ्टरही देण्यात आले आहे. ही ई-सायकल 36V 250W रिअर हब मोटरसह येते. यात 36V काढण्यायोग्य बॅटरी पॅक देण्यात आता आहे. जो सायकलमधून काढून तुम्ही घरातही चार्ज करू शकता.


या नवीन सायकलला अॅल्युमिनियम अलॉय व्हील आणि उत्तम पकड असलेले नायलॉन टायर मिळतात. यात पेडल असिस्ट फीचर देखील आहे. जे बॅटरी वाचवण्यास मदत करते. सायकलमध्ये दिलेले जाड टायर्स त्याला चांगली रोड ग्रिप देतात आणि यासोबतच यामुळे ही सायकल खूप आकर्षक दिसते. Doodle V2 फोल्ड करण्यायोग्य सायकल फ्रेमच्या मध्यभागी फोल्ड केली जाऊ शकते. फोल्डकेल्यावर पुढचे चाक मागे येते आणि सायकल अत्यंत कॉम्पॅक्ट होते. 


Voltrider Booty E-cycle 


दरम्यान, Voltrider या स्टार्टअप कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली इलेक्ट्रिक सायकल बूटी लॉन्च केली आहे. कंपनीने ही सायकल बूटी 120, बूटी 60 आणि बूटी 30 अशा तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली असून याची किंमत क्लॅनपनीने 45,000 रुपये इतकी ठेवली आहे. कंपनीने दावा केला आहे की, फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावू शकते. यात  24 Ah ची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही फक्त बॅटरीच्या पॉवरवर 55 ते 60 किलोमीटर धावू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI