Auto Expo 2023: चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीम्स (BYD) ने नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली सेडान BYD Seal सादर केली आहे. BYD ही इलेक्ट्रिक सेडान भारतात 2023 च्या चौथ्या तिमाहीत लॉन्च करणार. तर याची डिलिव्हरी तेव्हाच सुरु करण्यात येईल.


Auto Expo 2023: टेस्ला मॉडेल 3 शी करणार स्पर्धा 


BYD Seal ही कंपनीची भारतातील तिसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे. ही  ब्रँडच्या त्याच ई-प्लॅटफॉर्म 3.0 आर्किटेक्चरवर आधारित आहे, जे BYD eTo3 SUV साठी वापरण्यात आले होते. ऑटो एक्स्पोमध्ये आकर्षक फॉरेस्ट ग्रीन कलरमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. BYD Seal आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टेस्ला मॉडेल 3 शी स्पर्धा करते. ही इलेक्ट्रिक सेडानची लांबी 4,800 मिमी, रुंदी 1875 मिमी आणि उंची 1460 मिमी आहे. तुलनेत टेस्ला मॉडेल 3 लांबी, रुंदी आणि उंचीने लहान आहे. याव्यतिरिक्त BYD सीलचा व्हीलबेस देखील मॉडेल 3 च्या व्हीलबेसपेक्षा 45 मिमी लांब आहे. दोन्ही कारची तुलना करता सील ही टेस्ला मॉडेल 3 पेक्षा मोठी कार आहे.


BYD Seal डिझाइन


BYD सीलचे डिझाइन मुख्यत्वे ब्रँडच्या Ocean X कॉन्सेप्ट SUV शी प्रेरित आहे. जी 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. कूप-स्टायलिंग ऑल-ग्लास रूफ, फ्लश डोअर हँडल, चार बूमरॅंग-आकाराचे एलईडी डीआरएल, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि मागील बाजूस एलईडी लाइट बार यासारख्या काही खास डिझाइन एलिमेंटमुळे सील खूप वेगळी दिसते. सीलच्या आतील भागात 15.6-इंचाचा Rotating इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Atto3 मध्ये देखील मिळतो. त्याचप्रमाणे सेडानमधील 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्ले देखील Atto3 मधून कॅरी ओव्हर केले गेले आहेत. इतर सर्व BYD इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे सील देखील ब्रँडच्या ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारत मॉडेलसाठी सीलची बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरची माहिती अद्याप उघड झालेले नाहीत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सील दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, एक 61.4 kWh आणि 82.5 kWh युनिट. चायना लाइट-ड्युटी व्हेईकल टेस्ट सायकलनुसार (CLTC-Sils) याच्या लहान बॅटरी मॉडेलची रेंज 550km आहे, तर मोठी बॅटरी एका चार्जवर (CLTC नुसार) 700km ची रेंज देऊ शकते.


ऑटो एक्स्पो 2023 संबंधित बातम्या: 


Auto Expo 2023 Live Updates : टाटाने लॉन्च केली नवीन ALTROZ CNG, देशातील पहिली ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान कार


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI