Ampere Primus electric scooter: अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ग्रीव्हज इलेक्ट्रिकने ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये प्राइमस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. यासह कंपनीने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर - NXG आणि NXU प्रदर्शित केली आहे. वेगवेगळ्या रेंजनुसार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर करण्यात आल्या आहेत. अँपिअर प्राइमस ही हाय-स्पीड ई-स्कूटर आहे.


इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट BMS सह 3 Kwh LFP बॅटरी तंत्रज्ञान आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 77 किमी प्रतितास आहे, तर ती पाच सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. यात मिळणाऱ्या लांब लेगरूम आणि रुंद सीट्समुळे राइड ही खूप आरामदायी बनते. Ampere Primus ला 4 kW मिड-माउंट टॉर्कची मोटर मिळते. ही एका चार्जवर 100 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. स्कूटरमध्ये चार राइडिंग मोड उपलब्ध आहेत. यामध्ये इको, सिटी, पॉवर आणि रिव्हर्स मोड समाविष्ट आहेत. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात फोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन ब्लूटूथद्वारे उपलब्ध आहेत.


ही स्कूटर हिमालयन व्हाइट, रॉयल ऑरेंज, हॅवलॉक ब्लू आणि बक ब्लॅक या चार मेटॅलिक मॅट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, तर बॉडीयू पॅनल्स ड्युअल टोनमध्ये येतात. Ampere NXG ही IoT कनेक्टिव्हिटी असलेली एक कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे, तर Ampere NXU ही गिग वर्करसाठी डिझाइन केलेली आणखी एक कनेक्टेड स्कूटर आहे. ग्रीव्हज इलेक्ट्रिकने प्रवासी आणि कार्गो मोबिलिटीसाठी तीन इलेक्ट्रिक ट्रायसायकल देखील सादर केल्या आहेत. यामध्ये Greaves ELP, Greaves ELC आणि Greaves Aero Vision यांचा समावेश आहे. ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड (GEMPL) चे सीईओ आणि कार्यकारी संचालक संजय बहल म्हणाले, "जीईएमपीएल पोर्टफोलिओमध्ये 6 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहने सादर करताना आम्हाला आनंद होत आहे."


LML ची स्टार इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर


दरम्यान, ऑटो एक्सपो 2023 मध्ये LML कंपनीने आपली स्टार इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ही स्कूटी जितकी आधुनिक दिसते तितकेच जबरदस्त फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. या स्कूटीमध्ये चमकदार स्क्रीन, फोटो सेन्सिटिव्ह हेडलॅम्प आणि अॅडजस्टेबल सीट देण्यात आली आहे. याशिवाय या स्कूटीमध्ये बरेच काही ग्राहकांना मिळणार आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI