Auto Expo 2023 Live Updates : मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन

Auto Expo 2023 Live Updates : देशातील सर्वात मोठा ऑटो शो 'ऑटो एक्स्पो'चा (Auto Expo 2023) आज दुसरा दिवस आहे.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 12 Jan 2023 02:20 PM
Auto Expo 2023  : नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन

Auto Expo 2023  :  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ऑटो एक्स्पो 2023 चे औपचारिक उद्घाटन केले.  हा एक्स्पो 11 तारखेपासून सुरू झाला आहे. मात्र आज मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटो एक्स्पो 2023 चे उद्घाटन केले. तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हा ऑटो एक्स्पो सुरू झाला आहे. 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांना या एक्स्पोला भेट देण्याची मुभा असणार आहे. 

Auto Expo 2023  : मारुतीची फ्रॉन्क्स क्रॉसओवर कार सादर

Auto Expo 2023  : फ्रॉन्क्स क्रॉसओवर कार अनेक छान वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली.  या कारमध्ये हेड्स अप डिस्प्लेसह 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि 22.86 सेमी स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यासोबतच यात आर्किमिस साउंड सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड आणि ऍपल कार प्लेसह ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टंट देखील मिळेल. त्याचवेळी ते वायरलेस चार्जर आणि गियर शिफ्ट इंडिकेटरसह पॅडल शिफ्टरसह सुसज्ज आहे.

Auto Expo 2023  : मारुती सुझुकीची Jimny SUV कार 6 रंगांमध्ये उपलब्ध

Auto Expo 2023  : मारुती सुझुकीची Jimny SUV कार तुम्हाला 6 रंगांमध्ये मिळेल. यामध्ये नेक्सा ब्लू, ब्लूश ब्लॅक, सिझलिंग रेड, पर्ल व्हाइट, ग्रेनाइट ग्रे आणि कायनेटिक यलो या रंगाचा समावेश आहे.

Auto Expo 2023  : मारुतीने आपली क्रॉसओवर FRONX कार केली लॉन्च

Auto Expo 2023  : मारुतीने आपली क्रॉसओवर FRONX  कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केली आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कार आहे. तुम्हाला अलॉय व्हीलसह NEXTre' LED DRLs मिळतात. त्याचवेळी, तुम्हाला या वाहनात एक शक्तिशाली 1.0L टर्बो बूस्टर जेट इंजिन देखील आहे. हे वाहन अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Auto Expo 2023 : मारुतीने 5 डोअरची JIMNY SUV कार केली सादर

Auto Expo 2023 : मारुतीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली JIMNY SUV कार सादर केली आहे. या कारची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात ऑप्टिमाइज्ड बंपर, प्रॅक्टिकल ड्रिप रेल, वॉशरसह एलईडी हेडलॅम्प आहेत. ही कार ऑफ-रोडिंगसाठी उत्तम मानली जाते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या कारला 5 दरवाजे आहेत.

Morris Garages ने आपली हायड्रोजन कार MG Euniq 7 केली सादर...

Auto Expo 2023 :  ब्रिटीश कंपनी Morris Garages ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली हायड्रोजन SUV कार MG Euniq 7 कार सादर केली आहे. त्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 600 किमी पर्यंत धावू शकते. ही कार केवळ 3 मिनिटांत चार्ज केली जाऊ शकते.

आजही ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची ताकद पाहायला मिळणार

Auto Expo : कालच्याप्रमाणे आजही तुम्हाला ऑटो एक्सपोमध्ये मोठ्या संख्येने स्टार्टअप कंपन्यांचा सहभाग दिसेल. यासोबतच या स्टार्टअप कंपन्या प्रामुख्यानं इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांवर भर देणार आहे. 

Auto Expo : ऑटो एक्स्पोचा आज दुसरा दिवस

Auto Expo : ऑटो एक्स्पोचा आज दुसरा दिवस आहे.  दुसऱ्या दिवशीही सर्वांच्या नजरा मारुती आणि एमजीच्या काही वाहनांवर असतील. पण या सगळ्यात काही लोकप्रिय लक्झरी वाहन कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये दिसणार नाहीत.  महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, ऑडी, बीएमडब्ल्यू, फोक्सवॅगन आणि स्कोडा यांनी ऑटो एक्सपो 2023 साठी नोंदणी केलेली नाही.

टाटाने लॉन्च केली नवीन ALTROZ CNG, देशातील पहिली ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान कार

टाटा ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये ALTROZ CNG मॉडेल कार (TATA ALTROZ CNG CAR) लॉन्च केली आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ही भारतातील पहिली ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान असलेली कार आहे.


Auto Expo 2023: TATA ची नवीन इलेक्ट्रिक कार Sierra EV सादर

TATA ऑटो एक्सपो 2023 मध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार सादर करत आहे. यातच टाटाने नवीन इलेक्ट्रिक कार Sierra EV देखील प्रदर्शित केली आहे. 


 


Auto Expo 2023: टाटाची इलेक्ट्रिक कार Harrier EV ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित

TATA Harrier EV Ca: टाटाने ऑटो एक्सपोमध्ये आपली आलिशान कार हॅरियरचा (TATA Harrier EV कार) EV व्हर्जन प्रदर्शित केला आहे. 


 


Auto Expo 2023: TATA ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली पहिली EV कार AVINYA केली प्रदर्शित

टाटाने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार AVINYA सादर केली आहे. टाटाची ही 5 सीटर कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार दिसायला जबरदस्त आहे.



Auto Expo 2023: जबरदस्त आणि दमदार; ऑटो एक्स्पो 2023 मध्ये Tata Curvv प्रदर्शित

Tata Curvv ऑटो एक्सपो 2023 मध्ये शोकेस करण्यात आली आहे. लाल रंगाची ही कार संपूर्ण शो मध्ये लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. ही टाटाची पेट्रोल व्हर्जन कार आहे.


Tata New EV Car : टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार येणार समोर

Auto Expo 2023: इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी कंपनी टाटा मोटर्स ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. सध्या कंपनीने ही कार या शोमध्ये पडद्यात ठेवली आहे. अनेक लोक सकाळपासून या कारवरून पडदा उठण्याची वाट पाहत आहेत.


Auto Expo 2023: LML ची स्टार इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर

Auto Expo 2023: ऑटो एक्सपो 2023 मध्ये LML कंपनीने आपली स्टार इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ही स्कूटी जितकी आधुनिक दिसते तितकेच जबरदस्त फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. या स्कूटीमध्ये चमकदार स्क्रीन, फोटो सेन्सिटिव्ह हेडलॅम्प आणि अॅडजस्टेबल सीट देण्यात आली आहे. याशिवाय या स्कूटीमध्ये बरेच काही ग्राहकांना मिळणार आहे.


Auto Expo 2023: अशोक लेलँड इलेक्ट्रिक कमर्शिअल व्हेइकल मार्केटमध्ये सोडणार छाप, सादर केला इलेक्ट्रिक ट्रक

Auto Expo 2023: अशोक लेलँड हे व्यावसायिक वाहनांसाठी ओळखले जाते. पण आता ही कंपनी इलेक्ट्रिक कमर्शिअल व्हेइकल मार्केटमध्येही आपली छाप सोडायला तयार झाली आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अशोक लेलँडने एक हलके व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन BOSS सादर केले आहे. या वाहनात ग्राहकांना लिथियम बॅटरीचा सपोर्ट मिळतो, जी फास्ट चार्जिंगसाठी ओळखली जाते.


Keeway's SR 250 ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च, किंमत फक्त 1.49 लाख रुपये

Keeway ने आपली आलिशान बाईक SR250 (Keeway SR250 Bike) Auto Expo 2023 मध्ये लॉन्च केली आहे. रेड आणि ब्लॅक रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये ही दिसायला खूपच जबरदस्त दिसते. बाजारात कंपनीने या बाईकची प्रारंभिक किंमत 1.49 लाख रुपये ठेवली आहे.



Auto Expo 2023 : BYD ATTO 3 ची पहिली एक्सक्लुझिव्ह झलक 

BYD ATTO 3 ऑटो एक्स्पो 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारचा लूक जबरदस्त आहे.  BYD ATTO ची पहिली एक्सक्लुझिव्ह झलक 



Hyundai ची IONIQ 5 इलेक्ट्रिक SUV कार सादर

Hyundai ने आपली आलिशान इलेक्ट्रिक SUV कार IONIQ 5 ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केली आहे. या कारमध्ये पॅरामेट्रिक पिक्सेल एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत, तर फ्रंटमध्ये तुम्हाला प्रीमियम एलईडी सपोर्टही मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कार 18 ते 21 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. दुसरीकडे, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 613 ​​किलोमीटपर्यंत धावते.  या कारची किंमत 44,95000 ठेवण्यात आली आहे.



Auto Expo 2023: Hyundai ची Ioniq6 ev आलिशान इलेक्ट्रिक कार लॉन्च

 Auto Expo 2023: Hyundai ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली आलिशान इलेक्ट्रिक कार Ioniq6 ev लॉन्च केली आहे.



Maruti Suzuki : मारुतीने सादर केला Grand vitara आणि Brezza चा मॅट लूक

मारुतीने Grand vitara आणि Brezza चा मॅट लूक सादर केला आहेत. मॅट फिनिशमुळे गाडी शानदार दिसत आहे. Grand vitara आणि Brezza हा नवा लूक लोकांना आवडला आहे.

MG 4: 4.2 मीटर लांब MG 4 इलेक्ट्रिक कार, मिळणार ADAS फीचर


MG 4 इलेक्ट्रिक कार 4.2 मीटर लांब असून ती प्रीमियम हॅचबॅकसारखी दिसणार आहे.  या कारचे डॅशबोर्ड डिझाईन पूर्णपणे वेगळे असेल आणि तिला अनोखे बनवण्यासाठी छोट्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा वापर करण्यात आला आहे. यात फ्लोटिंग टचस्क्रीन असेल. यात ब्रेकिंगसाठी ADAS फीचर मिळेल, जे जवळपास MG ZS सारखे असणार आहे. 

Land Cruiser: ऑफरोडिंग अनुभवासाठी जगभरात ओळखली जाते Land Cruiser, भारतात प्रतीक्षा

Land Cruiser: लँड क्रूझर LC300 मध्ये 3.5 लिटरचे V6 ट्विन टर्बो गॅसोलीन इंजिन असणार आहे.  जे 305 kW आणि 650 Nm टॉर्क जनरेट करेल. त्याचे डिझेल इंजिन भारतात देखील उपलब्ध असेल.  3.3 लिटर V6 ट्विन टर्बो डिझेल इंजिन असेल. ही कार तिच्या ऑफरोडिंग अनुभवासाठी जगभरात ओळखली जाते. आता त्याची भारतात प्रतीक्षा आहे

MG : एका चार्जमध्ये 350km पर्यंत धावणार MG ची नवीन हॅचबॅक


MG ची नवीन हॅचबॅक (The 4 EV) MSP प्लॅटफॉर्मवर आधारित  आहे. एका चार्जमध्ये ही कार 350km पर्यंत धावणार आहे. या कारमधील बॅटरीची क्षमता 51kWh ते 64kWh पर्यंत असेल. 

Land Cruiser LC300: LC300 मध्ये JBLचे 14 स्पीकर

Land Cruiser LC300: LC300 मध्ये JBLचे  14 स्पीकर आहेत, कारला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो जे ऑफ रोडिंग असताना उत्तम काम करते. या कारमध्ये फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन देखील करण्यात येणार आहे.



Land Cruiser LC300: LC300 मध्ये JBLचे  14 स्पीकर

Land Cruiser LC300: LC300 मध्ये JBLचे  14 स्पीकर आहेत, कारला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो जे ऑफ रोडिंग असताना उत्तम काम करते. या कारमध्ये फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन देखील करण्यात येणार आहे.

JBM ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनेक नवीन बस केल्या सादर

दिल्लीस्थित ऑटो मोबाईल कंपनी JBM ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनेक नवीन बस सादर केल्या आहेत.  शहर बसेस, इंटरसिटी आणि गॅलेक्सी कोचपर्यंतच्या बसेसचाही समावेश आहे.

MG  Hector: एमजी हेक्टरची किंमत जाहीर

MG  Hector: एमजी हेक्टर नेक्स्ट जनरेशनने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपला पहिला लूक सादर केला आहे. ही लाल दिसणारी SUV कार तुमचे मन जिंकण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने या गाडीची किंमतही जाहीर केली आहे. बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 14,72,800 रुपये असणार आहे. 

MG  Hector: MG  Hector नेक्स्ट जनरेशनचा पहिला लूक

MG  Hector: MG हे  हेक्टर नेक्स्ट जनरेशनने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपला पहिला लूक  सादर केला आहे.  लाल रंगाची SUV एसयूवी मन जिंकण्यासाठी तयार आहे.  


 



Auto Expo 2023 Live: एकदा चार्ज केल्यानंतर 550 Km धावणार मारूती E V X

Auto Expo 2023 Live: मारुतीने आपली नवी कॉन्सेप्ट SUV कार E V X रिव्हिल  केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 550 किमी पर्यंत अंतर कापेल. कॉन्सेप्ट कारमध्ये  60KWH पॉवर  बॅटरी आहे. कार 2025 मध्ये लॉन्च होईल.

Maruti E V X:  मारुतीच्या नव्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कारचे नाव EV X, 2025 ला  येणार बाजारात 

Maruti E V X:  मारुतीच्या  कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कारचे नाव EV X असे आहे.  ही कार 2025 ला बाजारात येणार आहे.



Toyoto :  टोयोटोच्या फ्लेक्स फ्यूल कार पाहिली का?

Toyoto :  टोयोटोच्या फ्लेक्स फ्यूल कारने अनेकांची मने जिंकली आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कारवरून नजर हटवणे शक्य नाही.



Auto Expo 2023 : Toyota कडे फ्यूएल आणि हायड्रोजन पॉवर कारचा खजाना

Auto Expo 2023 :   ऑटो एक्स्पो 2023 मध्ये Toyota कडे दाखवण्यासाठी बरेच काही आहे. आज कंपनीने जबरदस्त निळ्या कार एक्सपोमध्ये सादर केली आहे.  तिच्या फ्लेक्स फ्यूएल आणि हायड्रोजन पॉवरने सर्वांना आश्चर्यचकित  केले आहे. 



Auto Expo 2023 : ऑटो एक्स्पोला दमदार सुरुवात झाली

 Auto Expo 2023 :  ऑटो एक्स्पोला दमदार सुरुवात झाली आहे. मारुतीने पहिली कार लॉन्च केली आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही अनेकांची मने जिंकत आहे.



Auto Expo 2023 :  आज ऑटो एक्सपो 2023 चा पहिला दिवस

Auto Expo 2023 :  ऑटो एक्सपो 2023 इंडिया एक्सपो मार्ट, ग्रेटर नोएडा  येथे सुरू आहे. जर तुम्हाला या एक्सपोला भेट द्यायची असेल तर जवळचे मेट्रो स्टेशन नॉलेज पार्क 2 आहे. 

Auto Expo 2023 : मोठ्या कंपन्यांसह अनेक ऑटोमोबाईल कंपन्या या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होणार

Auto Expo 2023 :  मारुती सुझुकी, टोयोटा, टाटा मोटर्स, एमजी, किया, ह्युंदाई मोटर इंडिया आणि बीवायडी यासारख्या मोठ्या कंपन्यांसह अनेक ऑटोमोबाईल कंपन्या या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, महिंद्रासह अनेक कंपन्यांनी शोमधून माघार घेतली आहे. 

Auto Expo 2023 : ऑटो एक्सपो 2023 आजपासून, वाचा कोणत्या दिवशी काय असणार?

Auto Expo 2023 : ऑटो एक्सपो 2023 मोटर शो ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथील एक्सपो मार्ट येथे आयोजित केला आहे. आजपासून म्हणजे 11 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत ऑटो एक्स्पो मोटर शोचे आयोजन करण्यात आले आहे. 11 आणि 12 जानेवारीचा शो फक्त मीडिया कर्मचार्‍यांसाठी राखीव आहे. तर 13 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत हा शो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ऑटो एक्स्पो मोटर शो सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत लोकांसाठी खुला असेल, तर वीकेंडला त्याची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत असेल. तसेच या शोच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 जानेवारीला याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अशी असेल.

पार्श्वभूमी

Auto Expo 2023 Live Updates : गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून देशातील सर्वात मोठा ऑटो शो 'ऑटो एक्स्पो' (Auto Expo 2023) सुरु होणार आहे. ऑटो एक्स्पो 2023 चे 16 वे एडिशन यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ऑटो एक्स्पो कंपोनंट शोचे आयोजन प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे केले आहे. तर ऑटो एक्स्पो मोटर शो ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे आयोजित करण्यात आले आहे. 


ऑटो एक्स्पो 2023 चे पहिले दोन दिवस म्हणजे 11 जानेवारी (आज) आणि 12 जानेवारी हे माध्यमांसाठी राखीव असतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी रोजी व्यापार्‍यांसाठी ते खुले राहील. 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ऑटो एक्स्पो मोटर शो सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत लोकांसाठी खुला असेल, तर वीकेंडला याची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत असेल. तसेच या शोच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 जानेवारीला याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अशी असेल.


कोणत्या कार कंपन्या सहभागी होत आहेत?


ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती सुझुकी, बीवायडी इंडिया, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया, एमजी मोटर इंडिया, किया इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटरसह अनेक कंपन्यांचा समावेश असेल. महिंद्रासह अनेक कंपन्या या शोमध्ये सहभागी होणार नाहीत. 


कोणत्या गाड्या होणार लॉन्च? 


ऑटो एक्स्पोमध्ये येणारी काही खास मॉडेल्स म्हणजे मारुती सुझुकी Jimny 5-डोअर, मारुतीची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही, ह्युंदाई आयोनिक 5, ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट, किया सेल्टोस फेसलिफ्ट, किया कार्निवल, किया ईव्ही9 कॉन्सेप्ट, एमजी एअर ईव्ही, एमजी हेक्टर फेसलिफ्ट, टोयोटामध्ये जीआर कोरोला, टाटा पंच ईव्ही, टाटा सफारी फेसलिफ्ट, बीवायडी सील ईव्हीसह अनेक कार समाविष्ट आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.