Audi Q3 Sportback bookings now open: जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकसाठी बुकिंग सुरु केली आहे. नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक स्पोर्टी आणि आकर्षक आहे. स्टँडर्ड म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हसह सुसज्ज ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकमध्ये 2.0 लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 190 एचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. ग्राहक नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक 2 लाख रूपयांच्या टोकन रक्कमसह बुक बुक करू शकता. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ....
Audi Q3 Sportback bookings now open: कुठे करता येईल बुक?
नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू या या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुक करता येऊ शकते.
ही सेगमेंटमधील पहिली कॉम्पॅक्ट कूपे क्रॉसओव्हर आहे. या कारच्या एक्स्टीरिअर फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, कम्फर्ट की सह गेस्चर-कंट्रोल्ड टेलगेट, 5 स्पोक व्ही स्टाइल ‘एस डिझाइन’ आर 18 अलॉई व्हील्स आणि हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज आदींचा समावेश आहे. तसेच इंटीरिअर फीचर्समध्ये ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस, एमएमआय नेव्हिगेशन प्लस सह एमएमआय टच, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, ऑडी फोन बॉक्स सह वायरलेस चार्जिंग, 2-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लंबर सपोर्ट, अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस आणि ऑडी साऊंड सिस्टम देण्यात आले आहे.
Audi Q3 Sportback bookings now open: ड्राइव्हेबिलिटी
· 2.0 लिटर टीएफएसआय इंजिन, 140 केडब्ल्यू (190 एचपी), 320 एनएम, 7.3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी/तास
· क्वॉट्रो – ऑल व्हील ड्राइव्ह
· 7 स्पीड एस ट्रॉनिक ट्रान्समिशन
· ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट
· प्रोग्रेसिव्ह स्टीअरिंग
· कम्पर्ट सस्पेंशन
· हिल स्टार्ट असिस्ट
· क्रूझ कंट्रोल सिस्टमसह स्पीड लिमिटर
· लेदरने रॅप केलेले 3 स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टीअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स
Audi Q3 Sportback bookings now open: एक्स्टीरिअर
· एस-लाइन एक्स्टीरिअर पॅकेज
· 45.72 सेमी (आर 18) 5-स्पोक व्ही-स्टाइल (‘एस’ डिझाइन) अलॉई व्हील्स
· पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ
· एलईडी हेडलॅम्प्स
· एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्ससह डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स
· हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
Audi Q3 Sportback bookings now open: इंटीरिअर
· अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस (30 रंग)
· पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह 4 वे लंबर सपोर्ट
· लेदर लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी
· रिअर सीट प्लससह फोअर /आफ्ट अॅडजस्टमेंट
· अॅल्युमिनिअम लुकमध्ये इंटीरिअर
· मायक्रो-मेटालिक सिल्व्हरमध्ये डेकोरेटिव्ह इनसर्ट्स
· फ्रण्ट डोअर स्कफ प्लेट्स, अॅल्युमिनिअम इनसर्टस्, ‘एस’ लोगोसह प्रकाशित
Audi Q3 Sportback bookings now open: फीचर्स
· 25.65 सेमी (10.1 इंच) एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच
· ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस
· ऑडी साऊंड सिस्टम (10 स्पीकर्स, 6 चॅनेल अॅम्प्लिफायर, 180 वॅट)
· ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टम
· ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
· 2-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम
· पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा
· कम्फर्ट की सह गेस्चर कंट्रोल्ड टेलगेट
· इलेक्ट्रिकली चालू-बंद होणारे लगेज कम्पार्टमेंट लिड
· एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर-अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्ही बाजूंनी ऑटो-डिमिंग
· फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर-व्ह्यू मिरर
· स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंअ पॅकेज
· 6 एअरबॅग्ज
· टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
· आयएसओएफआयएक्स चाइल्ड सीट अँर्क्स आणि आऊटर रिअर सीट्ससाठी टॉप टेथर
· अॅण्टी-थेफ्ट व्हील बोल्ट्स आणि स्पेस वाचवणारे स्पेअर व्हील
Car loan Information:
Calculate Car Loan EMI