Worlds Most Expensive Car Number Plate: जगभरात असे अनेक कारचे शौकीन आहेत, जे आपली कार इतरांपेक्षा वेगळी दिसावी म्हणून प्रयत्न करत असतात. कधी गाडी मॉडिफाय करून, कधी आपल्या गाडीचा व्हीआयपी नंबर घेऊन. भारतातही व्हीआयपी नंबरची (VIP Number) वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशातच आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागडी कार नंबर प्लेटबद्दल सांगणार आहोत. ज्याची किंमत तब्ब्ल 132 कोटी रुपये आहे. या कारची नंबर प्लेट इतकी महाग का आहे.



यात नेमकं काय आहे इतकं खास, हे जाणून घेऊ...


Worlds Most Expensive Car Number Plate: F1 जगातील सर्वात महाग कार नंबर प्लेट


F1 लिहिलेली नंबर प्लेट ही जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट आहे. ज्याची किंमत 132 कोटी रुपये आहे. F1 चा वापर जगप्रसिद्ध मोटरस्पोर्ट इव्हेंट फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी केला जातो. यूकेमधील एका व्यक्तीने या नंबर प्लेटसाठी 132 कोटी रुपये दिले आहेत. भारताप्रमाणेच ब्रिटनमध्येही कारच्या नंबरप्लेटची प्रचंड क्रेझ आहे. परंतु हा क्रमांक मर्यादित कालावधीसाठीच दिला जातो.


Worlds Most Expensive Car Number Plate: हा जगातील सर्वात लहान आणि महागडा क्रमांक 


F1 कार नंबर हा जगातील सर्वात लहान आणि महाग नंबर आहे. या नंबरमध्ये F1 सह अन्य कोणताही क्रमांक वापरला जात नाही. म्हणूनच याला जगातील सर्वात लहान नंबर देखील म्हटले जाते आणि यामुळेच हा नंबर अनेक हाय परफॉर्मन्स कारवर (बुगाटी वेरॉन, मर्सिडीज-मॅकलारेन एसएलआर) देखील दिसून आला आहे.


Worlds Most Expensive Car Number Plate: भारतातही नंबर प्लेटची क्रेझ 


भारतातही कारवर खास नंबर प्लेट लावण्याबाबत खूप क्रेझ आहे. गाडी लहान असो वा मोठी, याने काही फरक पडत नाही, परंतु बर्‍याचदा लोकांना आपल्या गाडीवर वेगळी नंबर प्लेट लावण्यात रस असतो आणि त्यामुळे अनेकवेळा ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा नंबर प्लेट वापरण्यास सुरुवात करतात. 


BH सीरीज नंबर प्लेट 


बीएच नंबर प्लेट्समुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात मोठा बदल झाला आहे. मात्र ही नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी नाही. तुमच्या वाहनासाठी ही नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही विशिष्ट पात्रता असणे आवश्यक आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील (central government) संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, ज्यांच्याकडे अशा नोकऱ्या आहेत, ज्यांची अनेक वेळा बदली झाली आहे, त्यांनाच ही प्लेट मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त सर्व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी ज्यांची कार्यालये चार पेक्षा जास्त राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत ते देखील त्यांच्या खाजगी वाहनांसाठी BH नोंदणी प्राप्त करण्यास पात्र आहेत. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI